Wednesday, October 28, 2026

INDW vs ZIMW: वैष्णवी शर्माने झिम्बाब्वेचा निम्मा संघ केला गारद, क्रिकेट कारकिर्दीत पहिल्यांदाच केली अशी कामगिरी

India Women vs Zimbabwe Women 3rd ODI: झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने विजय मिळवला. झिम्बाब्वेला या सामन्यात 131 धावांवर रोखलं होतं. यात वैष्णवी शर्माचं योगदान महत्त्वाचं होतं.

1/5 झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत वैष्णवी शर्माने प्रभावी कामगिरी केली. वडोदरा येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात या डावखुरी फिरकी गोलंदाज वैष्णवीने झिम्बाब्वेचा निम्मा संघ गारद केला. (Photo: BCCI Women Twitter) 2/5 वैष्णवी शर्माने झिम्बाब्वेविरुद्ध 10 षटकात फक्त 39 धावा देत पाच गडी बाद केले. तिच्या भेदक गोलंदाजीमुळे झिम्बाब्वेचा महिला संघ 39.5 षटकांत फक्त 131 धावांवर सर्वबाद झाला. (Photo: BCCI Women Twitter) 3/5 वैष्णवी शर्माने पहिली विकेट बीजाची काढली. त्यानंतर 16व्या षटकात तिने मुबाचिकवाला यष्टीचीत केले. मग 28व्या षटकात धुरुरु आणि 30व्या षटकात मावुंगाला बाद केले. त्यानंतर 34व्या षटकात ग्वांझुराला बाद करून तिने पाच बळी पूर्ण केले. वैष्णवीने झिम्बाब्वेविरुद्धच्या मागील सामन्यातही चार बळी घेतले होते. (Photo: BCCI Women Twitter) 4/5 वैष्णवीला या कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाल. वैष्णवीने सांगितलं की, 'मला खूप छान वाटत आहे. मी आभारी आहे.मी फक्त माझ्या प्रक्रियेचे पालन करत होते आणि त्यासोबतच विकेट्स मिळत गेल्या. त्याशिवाय, मी फक्त विचार करत होते की मला आज पाच विकेट्स पूर्ण करायच्या आहेत. माझ्या मनात फक्त हेच विचार चालू होते.' (Photo: BCCI Women Twitter) 5/5 वैष्णवी शर्मा पुढे म्हणाली की, 'मी माझी मानसिकता सुधारली आहे. मला उपलब्ध असलेल्या वेळेत, मी फलंदाजांना कसे ओळखावे आणि सामन्याच्या परिस्थितीचे मूल्यांकन कसे करावे हे शिकले. मी परिस्थितीनुसार गोलंदाजी करण्यावर आणि केवळ विकेट्स घेण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, माझ्या योजनांचे पालन करून त्या अंमलात आणण्यावर अधिक काम केले.' (Photo: BCCI Women Twitter)
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा