राज्यातील कृषी, अन्नप्रक्रिया आणि दुग्धजन्य पदार्थ उद्योगांना मोठी चालना देणारा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनी वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे तब्बल 2100 कोटी रुपयांची गुंतवणूक करून एक अत्याधुनिक एकात्मिक उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. फळांचे ज्यूस, अन्नप्रक्रिया तसेच कृषीमालावर आधारित उद्योगांच्या विकासाला पूरक ठरणाऱ्या या गुंतवणुकीमुळे स्थानिक शेतकरी, कृषीपूरक व्यवसाय आणि एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. यामुळे स्थानिक पातळीवर 550 जणांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'वर्षा' निवासस्थानी वरुण बेव्हरेजेस लिमिटेड आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात या संदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालास चांगला भाव मिळून मूल्यवर्धनाच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.
विदर्भातील औद्योगिक विकासाला चालना
या गुंतवणुकीमुळे वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा, पूरक व्यवसाय आणि स्थानिक आर्थिक व्यवहारांना गती मिळणार आहे. आर्वी येथील एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रात हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात दैनंदिन वापरातील ग्राहकोपयोगी वस्तू आणि पेयपदार्थांच्या निर्मितीसाठी अत्याधुनिक उत्पादन युनिट उभारण्यात येणार आहे. प्रस्तावानुसार, प्रकल्पाचे काम एप्रिल 2027 पासून सुरू करण्याचे नियोजन आहे.
🤝 CM Devendra Fadnavis presided over the signing and exchange of an MoU between the Government of Maharashtra (Industries Investment and Services Department) and Varun Beverages Ltd. for establishing state-of-the-art integrated manufacturing unit for FMCG & beverages at MIDC, Arvi, Wardha district, Maharashtra.
Key Highlights of the MoU:
🔸 Proposed Investment: ₹2100 crore
🔸 Direct Employment: 550 jobs
Objectives of the MoU:
✅ Direct jobs at the plant, plus indirect work in transport, packaging and distribution around Arvi.
✅ Boost to the surrounding industrial ecosystem, including agro-industries, packaging, transport and cold-storage suppliers.
✅ Creation of demand for local fruit and milk.
COO, Group Head-Technical, RjCorp & Varun Beverages Ltd. Rajinder Jeet Singh Bagga and senior officials were present.
🤝 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन (उद्योग, गुंतवणूक व सेवा विभाग) आणि वरुण बेव्हरेजेस लिमिटेड यांच्यात वर्धा जिल्ह्यातील एमआयडीसी, आर्वी येथे एफएमसीजी व पेय पदार्थांसाठी अत्याधुनिक एकात्मिक उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
सामंजस्य कराराची ठळक वैशिष्ट्ये :
🔸 प्रस्तावित गुंतवणूक : ₹2100 कोटी
🔸 थेट रोजगार संधी : 550
सामंजस्य कराराची उद्दिष्टे :
✅ प्रकल्पामुळे थेट रोजगारासोबतच आर्वी परिसरात वाहतूक, पॅकेजिंग व वितरण क्षेत्रांत अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
✅ कृषी-आधारित उद्योग, पॅकेजिंग, वाहतूक आणि शीतगृह पुरवठादारांसह परिसरातील औद्योगिक परिसंस्थेला चालना.
✅ स्थानिक स्तरावर फळे आणि दुधाच्या मागणीत वाढ.
यावेळी सीओओ, ग्रुप हेड-टेक्निकल, आरजे कॉर्प अँड वरुण बेव्हरेजेस लिमिटेड, राजिंदर जीत सिंह बग्गा व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 29, 2026
मुंबई: अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे वारकरी संप्रदायाचा गौरव वाढवणारे संत शिरोमणी रूपलालजी महाराज यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात ...
प्रकल्पासाठी शासनाचे सहकार्य
प्रकल्पाच्या उभारणीला गती देण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक त्या सर्व कायदेशीर परवानग्या, नोंदणी आणि ना-हरकत प्रमाणपत्रांची प्रक्रिया सुलभ केली जाईल. शासनाच्या विद्यमान धोरणात्मक नियमांनुसार आणि तरतुदींनुसार, कंपनीला लागू असणारे सर्व लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांमार्फत संपूर्ण सहकार्य करण्यात येईल.
या वेळी आमदार सुमित वानखेडे, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र कुशवाह, उद्योग आयुक्त कादंबरी बलकवडे, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या आयुक्त व व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे तसेच वरुण बेव्हरेजेस लिमिटेडचे मुख्य परिचालन अधिकारी तथा तांत्रिक विभागाचे समूहप्रमुख राजिंदर जीत सिंग बग्गा आदी मान्यवर उपस्थित होते.