Thursday, October 29, 2026

IND vs NZ: चौथ्या टी20 सामन्याच्या प्लेइंग 11 मधून वैभव सूर्यवंशीला बाहेर काढा! आर अश्विन असं का म्हणाला?

India vs New Zealand 4th T20I: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 मालिकेतील चौथा सामना ऑकलँडच्या ईडन पार्कवर होत आहे. या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये काही बदल होईल असं वाटत नाही. पण आर अश्विनने आपलं रोखठोक म्हणणं मांडलं आहे.

भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यासाठी सज्ज झाला आहे. हा सामना ऑकलँडच्या ईडन पार्कवर होणार आहे. या मैदानात भारताची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. त्यामुळे मालिकेतील कामगिरी आणि मैदानातील मागचा रेकॉर्ड पाहता भारताचं पारडं जड आहे. आता उर्वरित दोन सामन्यात न्यूझीलंड क्लिन स्विप देण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. त्यामुळे प्लेइंग 11 मध्ये फार काही बदल होईल असं वाटत नाही. पण चौथ्या टी20 सामन्यात इशान किशनचं कमबॅक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्लेइंग 11 कशी असेल? याबाबत चर्चा रंगली आहे. जर त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी दिली तर बाहेर कोणाला बसवणार? हा देखील प्रश्न आहे. पण आर अश्विने थेट वैभव सूर्यवंशीला बसवा, असा सल्ला दिला आहे. नेमकं काय म्हणाला ते जाणून घेऊयात...

काय म्हणाला आर अश्विन?

ऑकलँडवरील ईडन पार्कवर होणाऱ्या सामन्यापूर्वी आर अश्विनने आपलं मत मांडलं आहे. आर अश्विनने सांगितलं की, जर इशान किशन या सामन्यात खेळणार असेल तर वैभव सूर्यवंशीच्या जागी संजू सॅमसनने ओपनिंग करायला हवी. इशानला पहिल्या टी20 सामन्यात दुखापत झाली होती. त्यानंतर दोन सामन्यांना मुकला होता. त्यामुळे त्याच्या जागी वैभव सूर्यवंशीला संधी मिळाली होती. दुसऱ्या टी20 सामन्यात वैभव सूर्यवंशी तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला उतरला होता. तर तिसऱ्या टी20 सामन्यात ओपनिंग केली होती आणि संजू सॅमसन तिसऱ्या स्थानावर आला होता.

वैभव सूर्यवंशीला बसवा, कारण...

आर अश्विन म्हणाला की, 'या संघात इशान किशन बाहेर गेल्याने आणि सूर्यवंशी संघात आला. त्यामुळे कदाचित हा योग्य क्रम वाटतो, कारण संजूला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याचा अनुभव आहे. मात्र, जर इशान उद्या संघात परतला, तर मला वाटते की वैभवला वगळले जाईल आणि संजू त्याच्या योग्य सलामीच्या स्थानावर परत येईल.' आर अश्विन पुढे म्हणाला की, 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीकडून फार अपेक्षा आहेत. त्यामुळे त्याला विकसित होण्याची संधी मिळणं गरजेचं आहे. वैभवला आताताईपणे संधी देण्याच्या आणि त्याच्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवण्याच्या विरोधात आर अश्विन आहे. वैभव सूर्यवंशीने दुसऱ्या टी20 सामन्यात 4 आणि तिसऱ्या टी20 सामन्यात 19 चेंडूत 45 धावा केल्या होत्या.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >