Thursday, October 29, 2026

कुमार संगकारा आणि त्याच्या कुटुंबियांसोबत एअरपोर्टवर गैरवर्तन! नेमकं काय घडलं स्वत:च सांगितलं

श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकारासोबत धक्कादायक प्रकार घडा आहे. डब्लिनच्या एअरपोर्टवर रयानएअर एअरलाइनच्या कर्मचाऱ्यांवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि राजस्थान रॉयल्सचा हेड कोच कुमार संगकारा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. आयर्लंडमध्ये त्याला एका धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं आहे. आयर्लंडची राजधानी डब्लिनमध्ये रयानएअर एअरलाइनच्या कर्मचाऱ्यांवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. कुमार संगकाराने त्याच्यासोबत काय घडलं? याबाबत सविस्तर सोशल मीडियावर सांगितलं आहे. त्याला आणि त्याच्या कुटुंबाला एअरलाइनच्या गेटवरील कर्मचाऱ्यांकडून भेदभावपूर्ण आणि धमकीवजा वागणुकीचा सामना करावा लागल्याचं त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हंटलंआहे. सदर घटना अस्वीकार्य असल्याचं त्याने स्पष्टपणे नमूद केलं आहे. इतकंच काय तर डब्लिनमध्ये आलेला पहिला वाईट अनुभव असल्याचं सांगण्यासही विसरला नाही.

डब्लिनमध्ये नेमकं काय घडलं?

कुमार संगकाराने एक्सवर पोस्ट करत लिहिलं की, "डब्लिनमध्ये कोणाला रायनएअरच्या (Ryanair) भेदभाव करणाऱ्या गेट कर्मचाऱ्यांचा अनुभव आला आहे का? माझ्यासोबत आणि माझ्या कुटुंबासोबत आत्ताच असा प्रकार घडला आणि तो धक्कादायक होता." त्यांनी पुढे म्हटले, "संवादाची पद्धत, प्रक्रियेतील चुकीचा कारभार आणि धमकीवजा वर्तन. कोणत्याही प्रवाशासाठी हे अस्वीकार्य आहे. डब्लिनमधील हा माझा पहिलाच वाईट अनुभव आहे."

कुमार संगकाराची क्रिकेट कारकिर्द

आयपीएल स्पर्धेत कुमार संगकारा राजस्थान रॉयल्स संघाचा हेड कोच आहे. 2026 च्या पर्वापूर्वी त्याच्याकडे ही जबाबदारी सोपण्यात आली होती. यापूर्वी त्याने 2021 ते 2024 या कालावधीत हे पद सांभाळलं होतं.त्यानंतर 2024 मध्ये क्रिकेट संचालक म्हणून नियुक्ती झाली. 2024 ते 22025 या कालावधीत राहुल द्रविड या फ्रेंचायझीचा हेड कोच होता. त्यामुळे त्याच्याकडे क्रिकेट संचालकाची भूमिका दिली होती. संगकाराच्या मार्गदर्शनाखालीच राजस्थान रॉयल्स संघ 17 वर्षांनी आयपीएल अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र गुजरात टायटन्सकडून पराभूत झाला होता. 2026 मध्ये राजस्थानचा सघ चौथ्या स्थानावर राहिला.

कुमार संगकाराचं आंतरराष्ट्रीय कारकिर्द

कुमार संगकाराने कसोटी क्रिकेटमध्ये 12400 धावा केल्या आहेत. यात एकूण 38 शतकांचा समावेश आहे. तर वनडे त्याच्या नावावर 14234 धावा असून 25 शतकं आहेत. कुमार संगकाराने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 20911 धावा, तर लिस्ट ए मध्ये 19456 धावा केल्या आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >