Aditi Tatkare: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांत सुधारणा करण्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

प्रोत्साहन भत्त्याच्या सुधारित निकषांबाबत कर्मचारी संघटनांच्या मागणीसंदर्भात मंत्रालयात बैठक

मुंबई : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.(ANGANWADI WORKERS)


प्रोत्साहन भत्त्याच्या सुधारित निकषांबाबत कर्मचारी संघटनांच्या मागणीसंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी पोषण, आरोग्य, पूर्वशालेय शिक्षण, उपस्थिती आणि गृहभेटी आदी निकषांच्या आधारे प्रोत्साहन भत्ता निश्चित करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या.



यावेळी बैठकीस एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त माधवी सरदेशमुख, सहसचिव वी. रा. ठाकूर आदीसह अधिकारी उपस्थित होते.


राज्यात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे तसेच गर्भवती मातांच्या पोषणाची काळजी घेण्यासाठी 1,08,627 अंगणवाडी सेविका आणि 1,05,470 अंगणवाडी मदतनीस कार्यरत आहेत. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना त्यांच्या कामाच्या गुणवत्तेनुसार अनुक्रमे ₹1,500 ते ₹2,000 आणि ₹500 ते ₹1,000 प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता १ ऑक्टोबर 2024 पासून लागू करण्यात आला आहे.(ADITI TATKARE)



यावेळी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या अतिरिक्त आहार योजना, आदर्श अंगणवाडी योजना आणि बेबी केअर किट योजना यांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. सन 2026-27 या आर्थिक वर्षात या योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मंत्री तटकरे यांनी सूचना दिल्या.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis: मुंबईचा ऐतिहासिक वारसा समृद्ध होणार; शिवडी किल्ला आणि वरळी परिसराच्या संवर्धनाला वेग

मुंबई: मुंबईचा समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि लोकपरंपरांचा वारसा जतन करून तो पुढील पिढ्यांपर्यंत

Devendra Fadnavis: अंजनगाव सुर्जीमध्ये साकारणार संत रूपलालजी महाराजांचे भव्य राष्ट्रीय स्मारक; ₹80 कोटींच्या आराखड्याला मंजुरी

मुंबई: अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे वारकरी संप्रदायाचा गौरव वाढवणारे संत शिरोमणी रूपलालजी महाराज

Mumbai Crime News : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, दिंडोशीतून 1.28 कोटींचे अमली पदार्थ जप्त; तरुणाला अटक

Mumbai Crime News: मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कारवाई करत सुमारे 1.28 कोटी रुपये किमतीचे MD

BMC Education Department : महापालिका शिक्षण विभागातील काहींची मक्तेदारी आणि भ्रष्टाचार भाजप मोडित काढणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात काही व्यक्तींचे साटेलोटे असून त्यांच्या

BMC Hospitals : महापालिका रुग्णालयांमधील रुग्णांच्या ताटात बासमती भात, स्वस्त दरातील भाजीपाला,कडधान्य खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांसह प्रसुतीगृहांमध्ये आंतररुग्णांना दोन्ही वेळचे

Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा सहभाग नाही; वकिलाचा दावा, 11 आरोपींवर MCOCA अंतर्गत कारवाई

Mumbai Crime News: अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा