
Jalgaon Accident News : जळगावमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. जळगाव–भुसावळ महामार्गावर नशिराबादजवळील मकरा फटाक्यांसमोर मध्यराञी दोन ट्रकची समोरा-समोर भीषण धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की यात ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. रमेश यादव असे या अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. तर दुसऱ्या ट्रकचा चालक हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ट्रक क्रमांक MH 40 BG 6287 हा सोयाबीन घेऊन गुजरातहून नागपूरच्या दिशेने जात होता. रात्री अकरा वाजेच्या सुमारास नशिराबादजवळील मकरा फटाक्यांसमोर या ट्रकची समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकशी जोरदार धडक झाली. दुसरा ट्रक दीपनगर येथून राख भरून नाशिकच्या दिशेने जात असल्याची माहिती आहे. हा ट्रक मुक्तचर अली (रा. मध्य प्रदेश) चालवत असल्याचे सांगण्यात आले आहे. या धडकेत सोयाबीन वाहतूक करणाऱ्या ट्रकचा चालक रमेश यादव केबिनमध्ये अडकले.
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महाध्वज प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, ३० ऑक्टोबरपासून या ...
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. अपघातानंतर रमेश यादव हे ट्रकच्या केबिनमध्ये तब्बल एक तास अडकून पडले होते. अखेर क्रेनच्या सहाय्याने ट्रक ओढून आणि हलवून तब्बल एक तासाच्या प्रयत्नांनंतर रमेश यादव यांना बाहेर काढण्यात यश आले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पुढील कारवाई सुरु केली आहे.






