Friday, October 30, 2026

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात श्रेयस अय्यरच्या नावावर अनोखा विक्रम, असं यापूर्वी कधीच घडलं नाही

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात श्रेयस अय्यरच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर हा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. यापूर्वी कोणत्याही कर्णधाराचं नशिब इतकं चमकं नव्हतं.

1/5 न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत श्रेयस अय्यरचं नशिब जोरदार असल्याचं दिसत आहे. खरं तर या मालिकेत मिचेल सँटनरला आपल्या मनासारखा निर्णयच घेता आला नाही. कारण आतापर्यंत चारही सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यर त्याच्यापेक्षा वरचढ ठरला आहे. (Photo: ANI) 2/5 न्यूझीलंडविरुद्ध खेळत असलेल्या टी20 मालिकेतील चौथ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि एक अनोखा विक्रम नावावर केला. (Photo: ANI) 3/5 श्रेयस अय्यर पहिल्या 25 सामन्यात सर्वाधिक नाणेफेकीचा कौल जिंकणारा कर्णधार ठरालआहे. त्याच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत 25 टी20 सामने खेळले आणि 19 सामन्यात विजय मिळवला. त्याने डॅरेन सॅमी आणि सलमान आगाचा विक्रम मोडीत काढला. या दोघांनी प्रत्येकी 17 टॉस जिंकले होते. (Photo: BCCI Twitter) 4/5 न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेकीचा कौल जिंकल्याचा फायदाही टीम इंडियाला झाला आहे. भारताला मनासारखा निर्णय घेता आला. तसेच तीन सामन्यात सलग विजय मिळवून मालिकाही खिशात घातली. (Photo: ANI) 5/5 श्रेयस अय्यरने सलग 8 सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकण्याचा विक्रमही नोंदवला आहे. यासह त्याने महेंद्रसिंह धोनीचा विक्रमही मोडीत काढला आहे. धोनीने सलग 7 सामन्यात नाणेफेक जिंकली होती. (Photo: BCCI Twitter)  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा