Saturday, October 31, 2026

त्र्यंबकेश्वर कुशावर्त तीर्थावर सिंहस्थ धार्मिक विधींना प्रारंभ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजा

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ध्वजारोहन कार्यक्रम पार पडत आहे. त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्तमध्ये, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात येत आहे. 1/5 सिंहस्थ कुंभेमळ्याच्या ध्वजारोहन सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्त येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुजेला सुरूवात झाली आहे. काही वेळेपूर्वीच या पूजेला सुरूवात झाली असून नाशिककर या पूजेसाठी उपस्थित आहेत. 2/5 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तीर्थराज कुशावर्तावर धर्मध्वज अनावरणाआधीच्या धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे. यावेळी अनेक मठाधिपती सुद्धा उपस्थित होते. 3/5 नाशिकमध्ये, 12 वर्षांनंतर एकदा कुंभमेळ्याचे पर्व सुरू होणार आहे, या पार्श्वभूमीवर आज ध्वजारोहनाचा कार्यक्रम आहे. दुपारी 12.02 वाजता शुभमुहूर्तावर नाशिकच्या रामकुंडावर आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्तमध्ये ध्वजारोहन करण्यात येणार आहे.   4/5 काल रात्री उशिरा मुख्यमंत्री नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी नाशिकमध्ये येताच नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील दोन्ही ठिकाणचा आढावा घेत कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती घेतली. इतकंच नाही तर, इतरत्र माहिती सुद्धा त्यांनी घेतली.   5/5 त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती पाहायला मिळत आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >