मुंबई: सध्याच्या डिजीटल आणि आधुनिक युगात स्मार्टवॉच हे केवळ वेळ पाहण्याचे साधन न राहता प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे हेल्थ गॅझेट बनले आहे. प्रीमियम ब्रँड असो की बजेट- फ्रेंडली घड्याळ घालता तेव्हा स्मार्टवॉच्या मागचा हिरव्या रंगाचा लाईट सतत चालू- बंद होत असतो. स्मार्टवॉच आपल्याला आरोग्यासंबंधित वेगवेगळी माहिती पुरवत असते. हृदयाचे ठोके मोजण्याचे फिचर युजर्सकडून सर्वात जास्त वापरले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यासाठी रक्त काढण्याची किंवा सुई टोचण्याची गरज नसते. सोप्या भाषेत सांगायचे तर, घड्याळ तुमच्या मनगटावर फिट केलं की, तुम्हाला काही सेकंदातच हृदयाचे ठोके स्क्रीनवर दिसतात. यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की, कोणत्याही मशिन शिवाय, स्मार्टवॉच हृदयाचे ठोके कसे मोजू शकते?
हे शक्य होतं, फोटोप्लेथिस्मोग्राफी (Photoplethysmography- PPG) नावाच्या एका अनोख्या ऑप्टिकल टेक्निकमुळे... हे तंत्र माणसाच्या शरीरातील रक्तप्रवाहातील सूक्ष्म बदल ओळखण्याचा प्रयत्न करते. स्मार्टवॉच मधील सेन्सर्स त्वचेवर प्रकाश टाकतात आणि हृदयाच्या ठोक्यांचा अंदाज घेण्यासाठी त्या संकेतांचे विश्लेषण करतात. ही संपूर्ण प्रक्रिया कशी कार्य करते, जाणून घेऊया...
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा भवनाच्या जागेवर आता टाऊन हॉल ...
जर तुम्ही तुमच्या स्मार्टवॉचच्या मागच्या बाजूला पाहिले असेल, तर तुम्हाला काही छोटे सेन्सर्स आणि एक हिरवी लाईट दिसली असेल. ही लाईट मनुष्याच्या हृदयाचे ठोके मोजण्याचे काम करते. स्मार्टवॉचची LED Censor त्वचेमध्ये हिरवा लाईट टाकते. त्यानंतर एक फोटोडायोड सेन्सर त्वचेच्या आत किती हिरवी लाईट पोहोचवतो, हे मोजतो. जेव्हा हृदयाचे ठोके वाढतात, तेव्हा धमन्यांमधील रक्तप्रवाह वाढतो, ज्यामुळे मनगटातील रक्तवाहिन्यांमधील रक्ताच्या प्रमाणात किंचित बदल होतो. रक्त आजूबाजूच्या ऊतींपेक्षा हिरवा प्रकाश जास्त शोषून घेते. त्यामुळे, हृदयाच्या ठोक्याबरोबर रक्ताचे प्रमाण वाढत असताना, सेन्सरकडे परत येणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण कमी होते.
स्मार्टवॉचचा सेन्सर प्रकाशातील प्रत्येक लहान- मोठे बदल नोंदवत असतो. त्याचे विश्लेषण घड्याळाचे सॉफ्टवेअर करते. प्रत्येक ठोक्यासोबत मिळणाऱ्या संकेतांचा नमुना ओळखून, तुमच्या हृदयाचे एका मिनिटामध्ये किती ठोके जाणून होतात, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. या टेक्निकला बीपीएम (बीट्स पर मिनिट) म्हणतात. जर स्मार्टवॉचच्या स्क्रीनवर 75 बीपीएम दिसत असेल, तर याचा अर्थ तुमचे हृदयाचे ठोके प्रति मिनिट अंदाजे 75 इतके आहे. स्मार्टवॉच फक्त लाईटच्या आधारावरच हृदयाचे ठोके मोजत नाहीत. त्यांच्यामध्ये विशेष अल्गोरिदम देखील असतात, जे बाह्य हालचाल आणि इतर घटकांमुळे निर्माण होणारे खोटे संकेत कमी करण्याचा प्रयत्न करतात.
मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील बांधकामाच्या ठिकाणी प्रदुषण नियंत्रणाच्या उपाययोजनांचा भाग म्हणून हवेच्या गुणवत्तेचे मोजमाप करण्यासाठी सेन्सर आधारीत ...
स्मार्टवॉचमध्ये हृदयाच्या ठोक्यांची नोंद सामान्यत: दैनंदिन कामांमध्ये आणि विश्रांतीच्या वेळी सुद्धा होते. तथापि, त्याची अचूकता अनेक घटकांवर अवलंबून असते. जर तुम्ही घड्याळ मनगटावर सैल घातले असेल, तर सेन्सर तुमच्या हृदयाचे ठोके मोजत नाही. धावणे, व्यायाम करणे किंवा हातांची जोरदार हालचाल करणे याचीही नोंद घड्याळ करते. त्वचेचा रंग, मनगटावरील टॅटू, शरीराचे तापमान आणि सेन्सरची गुणवत्ता यांचाही काही उपकरणांमधील नोंदींवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, वेगवेगळ्या स्मार्टवॉचमधील हृदयाच्या ठोक्यांच्या नोंदींमध्ये थोडा फरक आढळेल.
बरेच लोक PPG सेन्सर आणि ECG फीचरला एकच गोष्ट समजतात, पण त्यामागील तंत्रज्ञान वेगळे आहे. PPG सेन्सर प्रकाशाचा वापर करून रक्तप्रवाहातील बदल मोजतो. ECG म्हणजे, इलेक्ट्रो कार्डिओग्राम हे फिचर हृदयाच्या विद्युत हालचालींची नोंद करते. काही स्मार्टवॉचमध्ये ECG फीचरदेखील उपलब्ध असते, पण यासाठी सहसा तुमच्या बोटाने घड्याळाला एक वेगळा इलेक्ट्रोड लावावा लागतो. हे फीचर सामान्य हार्ट रेट मॉनिटरपेक्षा वेगळे आहे आणि ते सर्व स्मार्टवॉचवर उपलब्ध नसते.