IND vs NZ: संजू सॅमसन न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा फेल, संधी आणि बॅटिंगचं झोंबणारं कटू सत्य

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाचवा टी20 सामना सुरू आहे. या सामन्यात भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. त्यामुळे मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. मात्र आघाडीला आलेला संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा दोघंही फेल गेले.

भारताने न्यूझीलंडविरुद्धची टी20 मालिका आधीच खिशात घातली आहे. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांची तशी काही चिंता नव्हती. पण भारतीय खेळाडूंना आपली कामगिरी उंचवण्याची संधी होती. ही संधी संजू सॅमसनकडे होती. मात्र त्या संधीचं सोनं करण्यात त्याला अपयश आलं. वैभव सूर्यवंशीसारखा फॉर्मात असलेला खेळाडू असताना संजू सॅमसनला वारंवार संधी दिली गेली. त्यातही त्याला फार काही करता आलेलं नाही. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यावर टीका होत आहे. संजू सॅमसनला टी20 वर्ल्डकपमधील कामगिरीच्या आधारावर वारंवार संधी दिली जात असल्याचा आरोप होत आहे. आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत संजू सॅमसन फेल गेल्याने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संजू सॅमसनची न्यूझीलंडमधील कामगिरी


न्यूझीलंड दौऱ्यात संजू सॅमसन पूर्णपणे फेल गेल्याचं दिसून आलं आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात संजू सॅमसनने 68 धावांची खेळी केली. मात्र त्या नंतरच्या चारही सामन्यात त्याची बॅट शांत राहिली. चारही डावांच्या धावांची बेरीज केली तर पहिल्या सामन्याइतक्या धावा होत नाहीत. शेवटच्या दोन सामन्यात तर त्याला एकेरी धावसंख्येवरच तंबूत परतावं लागलं. खरं तर पाचव्या टी20 सामन्यात काही तरी चांगलं करेल अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांना होती. पण या सामन्यातही त्याने भ्रमनिरास केला. संजू सॅमसनने 10 चेंडूंचा सामना केला आणि फक्त 4 धावा करून तंबूत परतला. संजू सॅमसनने पाच डावात मिळून 107 धावा केल्या आहेत.


विश्वचष्कात विजय मिळवून दिला म्हणून...


टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत संजू सॅमसने टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघात वारंवार संधी दिली गेली. संजू सॅमसनने या वर्षात 30 डावात फलंदाजी केली आणि 810 धावा केल्या. भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा या वर्षातील तिसरा फलंदाज आहे. पण त्याला संघात वारंवार संधी देण्याचं हे कारण आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. संजू सॅमसनने भारतात खेळलेल्या सामन्यात सर्वाधिक धावा केल्या आहे. तर भारताबाहेर खेळलेल्या 12 डावात त्याने 13च्या सरासरीने फक्त 158 धावा केल्या आहेत. यात फक्त एक अर्धशतक आहे. संजू सॅसमन आयर्लंड, इंग्लंड, न्यूझीलंड आणि जापानमध्येही फेल गेला. त्याची खेळी पाहता पुढे त्याला संधी मिळणं कठीण दिसत आहे.
Comments
Add Comment

Rohit Sharma : विजय हजारे ट्रॉफीत रोहितचा जलवा पाहायला मिळणार; मुंबईकडून खेळण्यास होकार

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा लवकरच देशांतर्गत क्रिकेटमध्ये

IND vs NZ 5th T20: पाचव्या सामन्यात न्यूझीलंडच्या मनासारखं, भारताची प्रथम फलंदाजी; श्रेयस अय्यर म्हणाला..

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू असून शेवटचा सामना होत आहे. पाचवा टी20 सामना

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठी उलथापालथ, न्यूझीलंड पहिल्या स्थानावर; भारतालाही होणार फायदा! कसं काय समजून घ्या

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचं दोन वर्षांचं गणित असतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या पर्वाला 2025

ऑस्ट्रेलियाच्या लाजिरवाण्या पराभवावर डेव्हिड वॉर्नर संतापला! पॅट कमिन्सच्या संघाला सुनावले; म्हणाला, 'ही ऑस्ट्रेलियन क्रिकेटची ओळख नाही!'

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Auqib Nabi : कोहलीला नेट्समध्ये चकवले, आता न्यूझीलंडविरुद्ध मैदान गाजवणार?

मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

IND vs NZ 5th T20 : न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा सामना; वैभवसह 3 खेळाडूंना मिळणार संधी?

हॅमिल्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अखेरचा सामना आज (1 नोव्हेंबर) हॅमिल्टन