श्रेयस अय्यर पराभवाबाबत काय म्हणाला?
पाचव्या सामन्यातील पराभवाबाबत सांगताना श्रेयस अय्यर म्हणाला की, 'खरं सांगायचं तर, ती कामगिरी समाधानकारक होती. मधल्या षटकांमध्ये आम्हाला जी सुरुवात मिळाली, ज्याप्रकारे मी आणि fशानने गती निर्माण केली, ते पाहता आम्ही अधिक चांगली कामगिरी करू शकलो असतो. आम्ही एकापाठोपाठ एक विकेट गमावल्या. आणि मग अचानक नवीन फलंदाजावर दबाव आला. ती खेळपट्टी खेळायला सोपी नव्हती, विशेषतः जेव्हा चेंडू स्विंग होत होता आणि थोडा थांबत होता. आणि कधीकधी तो घसरतही होता. तुम्ही माझ्यासारखे आणि तिलकसारखे काही खेळाडू पाहिले असतील, आम्ही अशाच प्रकारे बाद झालो. त्यामुळे हो, ते आव्हानात्मक होते, विशेषतः त्या हार्ड लेंथवर.'
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेचा निकाल 3-2 असा लागला. भारताने या तीन सामने जिंकल्याने मालिका खिशात घातली. पण चौथ्या आणि ...
विजयासाठी दिलेल्या धावांबाबत श्रेयस अय्यर म्हणाला की, '191 धावांपर्यंत पोहोचणे, मला वाटते की ते समाधानकारक होते. मला वाटते की आम्ही आमच्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात अजूनही अधिक चांगली कामगिरी करू शकलो असतो. आम्ही थोडे ढिसाळ होतो. पण खूप काही शिकायला मिळालं. मला वाटतं की परदेशात, न्यूझीलंडमध्ये येऊन, इतक्या वेगवेगळ्या प्रसंगी, वेगवेगळ्या मैदानांवर खेळायला मिळालं. हो, खूप काही शिकायला मिळालं.'
भारतीय टी20 संघाची सध्याची स्थिती आणि सुधारणा करण्याच्या क्षेत्रांबद्दल श्रेयस अय्यर म्हणाला का, 'मला वाटतं की आज आम्हाला एक संधी मिळाली होती, ज्याचा आम्ही फायदा घेऊ इच्छित होतो, पण आम्ही घेऊ शकलो नाही. पण, आम्ही विचारमंथन करू शकतो आणि आम्हाला काही गोष्टींवर काम करावे लागेल, विशेषतः क्षेत्ररक्षणावर. खेळाचा हा एक पैलू आहे ज्यामध्ये आम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे. पण खरं सांगायचं तर, जेव्हा तुम्ही अशा अंधुक प्रकाशात आणि निरभ्र आकाशाखाली खेळता, तेव्हा ते इतकं सोपं नसतं. भारतात आम्हाला असं वातावरण फारसं मिळत नाही. पण हो, हा एक उत्तम शिकण्याचा अनुभव आहे.'