Maharashtra Drought: मराठवाड्यातील उद्योजकांकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी 6 कोटींची मदतनिधी, धनादेश मुख्यमंंत्र्यांकडे सुपूर्त

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, चारा उपलब्धतेचा प्रश्न तसेच शेतकऱ्यांसमोरील अडचणी लक्षात घेऊन शहरातील उद्योजकांनी सामाजिक बांधिलकीतून मदतनिधी गोळा करत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश दिला.

मुंबई: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मराठवाड्यातील उद्योजकांनी पुढाकार घेत आज 6 कोटी 18 लाख रुपयांचा धनादेश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला. मराठवाड्यातील उद्योजकांचे आभार व्यक्त करत बळीराजाच्या पाठीशी कायमच शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही आज मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगरमधून पुन्हा एकदा दिली.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवेंद्र सेवा महोत्सव समितीच्या वतीने 1 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील जबिंदा मैदान, बीड बायपास येथे ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून शेतकऱ्यांना नवी प्रेरणा आणि बळ मिळणार आहे. छत्रपतींच्या विचारांवर शासन काम करीत असून, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.



'प्रौढ प्रताप पुरंदर’ ऐतिहासिक महानाट्याच्या कार्यक्रमाला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, आमदार अनुराधा चव्हाण आणि जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण कुचे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवाय, जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी, ह.भ.प. भास्करगिरी महाराज, महंत रामगिरी महाराज, महंत शिवाजी महाराज आणि ह.भ.प. महंत विष्णू महाराज शास्त्री यांची विशेष उपस्थिती होती.


मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, चारा उपलब्धतेचा प्रश्न तसेच शेतकऱ्यांसमोरील अडचणी लक्षात घेऊन शहरातील उद्योजकांनी सामाजिक बांधिलकीतून मदतनिधी गोळा केला. या उपक्रमातून संकलित झालेला 6 कोटी 18 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उद्योजकांनी दाखविलेली एकजूट महत्त्वपूर्ण असल्याचे मुख्यमंत्री यांनी नमूद केले.



छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून संघर्ष, स्वाभिमान, लोककल्याण आणि शेतकरीहिताचा विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही मुख्यमंत्री यांनी केले. छत्रपतींच्या विचारांचा वारसा स्मरणात ठेवण्यासाठी त्यांनी हजारोंच्या समुदायाला साद घातली. तत्कालीन परिस्थितीचे स्मरण करून शिवरायांचा पराक्रम, त्यांचा संघर्ष आणि स्वराज्यनिर्मितीमागील प्रेरणा जाणून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. छत्रपतींच्या विचारांवर आधारित लोककल्याणकारी शासनाची भूमिका असून, शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या महानाट्याचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती महेंद्र वसंतराव राजेमहाडिक यांनी केली. हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांनी या ऐतिहासिक महानाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांसोबत या नाट्याचा आस्वाद घेतला. जवळवास 15 हजाराहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते.



देवेंद्र सेवा महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र साबळे पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाने ऐतिहासिक वारशाचे स्मरण आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उद्योजकांनी दिलेले योगदान मराठवाड्यातील सामाजिक एकजुटीचे प्रतीक ठरले.कार्यक्रमाच्या प्रारंभी विविध संस्थांच्या महंतांचे पाद्यपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच देवेंद समितीच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक हजार पाण्याच्या टाक्या व महिला सक्षमीकरिता 500 शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

Comments
Add Comment

Smart Watch Sensor: हातातलं स्मार्टवॉच हृदयाचे ठोके कसं मोजतं? 99.9% टक्के लोकांना माहितीच नाही उत्तर...

मुंबई: सध्याच्या डिजीटल आणि आधुनिक युगात स्मार्टवॉच हे केवळ वेळ पाहण्याचे साधन न राहता प्रत्येकाच्या

What If Oxygen Disappears: फक्त 5 सेकंदासाठी पृथ्वीवरून ऑक्सिजन गायब झाला तर? जगण्याची कल्पना करणंच अशक्य!

मुंबई: मनुष्याला ज्या प्रमाणे, पाणी आणि अन्नाची गरज असते, त्या प्रमाणेच हवेची सुद्धा गरज असते. हवेच्या

छत्रपती संभाजीनगरला 34 एसी इलेक्ट्रिक बसची भेट! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, आरामदायी व पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने छत्रपती

केंद्र सरकारकडून राज्यांना दिवाळी भेट; महाराष्ट्राच्या वाट्याला 7 हजार कोटी!

नवी दिल्ली: केंद्र सरकारनं देशातील सर्व राज्यांना दिवाळी गिफ्ट दिलं आहे. दिवाळीच्या आधी केंद्र सरकारने सर्व

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट! 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट; मुंबईत काय स्थिती?

मुंबई : ऑक्टोबर महिना संपताच नोव्हेंबरच्या सुरुवातीलाही महाराष्ट्रातील हवामानात बदल पाहायला मिळत आहे.

1 नोव्हेंबरपासून राज्यात ‘आरोग्य संवाद यात्रा’, आरोग्यमंत्री थेट जनतेशी संवाद साधणार...

मुंबई: राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यासाठी सार्वजनिक