Nita Ambani : नीता अंबानींचा मोठा सामाजिक उपक्रम! कर्जतमध्ये 100 एकरांवर उभारणार ‘अनंत आश्रय’; 5 हजारांहून अधिक जणांना मिळणार निवारा

या प्रकल्पाच्या माध्यमातून अनाथ मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसह 5 हजारांहून अधिक गरजू नागरिकांना आयुष्यभरासाठी निवारा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.

Mumbai News: रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून नीता अंबानी यांनी आणखी एका मोठ्या सामाजिक उपक्रमाची घोषणा केली आहे. मुंबईजवळील कर्जत येथे 100 एकर क्षेत्रावर ‘अनंत आश्रय’ नावाची भव्य निवासी टाऊनशिप उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून अनाथ मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसह 5 हजारांहून अधिक गरजू नागरिकांना आयुष्यभरासाठी निवारा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.



नीता अंबानी यांच्या हस्ते भूमिपूजन


रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता एम. अंबानी यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. रविवारी त्यांच्या हस्ते ‘अनंत आश्रय’ प्रकल्पाचे भूमिपूजन आणि पायाभरणी समारंभ पार पडला. या प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाणार आहे.





निवासासह आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा


‘अनंत आश्रय’मध्ये केवळ निवासाची सुविधाच नाही, तर नागरिकांच्या दैनंदिन गरजा आणि देखभालीची व्यवस्थाही केली जाणार आहे. येथे विशेष वैद्यकीय उपचार, आरोग्यसेवा, पुनर्वसन, शिक्षण आणि व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण अशा विविध सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.


या निवासी संकुलात रहिवाशांसोबतच त्यांच्या देखभालीसाठी कर्मचारी, डॉक्टर, आरोग्यसेवक आणि इतर सहाय्यक कर्मचारीही उपलब्ध असतील. त्यामुळे या प्रकल्पातून सुमारे 15 हजार नागरिकांचा एक मोठा समुदाय निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


गरजू नागरिकांना सुरक्षित निवारा, आरोग्यसेवा आणि आवश्यक आधार मिळावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अनेक नागरिकांना दीर्घकालीन निवास आणि विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.


Comments
Add Comment

BMC New Building : मुंबई महापालिकेचे नवीन सभागृह 2029 मध्ये; टाऊन हॉल, जिमखान्यासह उभारणार नवी वास्तू

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा

मुंबईतील 3,000 प्रदूषण मोजमाप LED फलकांची तपासणी होणार; महापालिकेचे थर्ड पार्टी ऑडिट

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील बांधकामाच्या ठिकाणी प्रदुषण नियंत्रणाच्या उपाययोजनांचा भाग म्हणून हवेच्या

BMC News: महापालिकेच्या नायर रुग्णालयाच्या अग्निसुरक्षेवर प्रश्नचिन्ह! सातही इमारतींमध्ये बसवणार नवी सुरक्षा प्रणाली

मुंबई (सचिन धानजी) : रुग्णालयांमधील आगीच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील महापालिका रुग्णालयांचे ऑडीट

मुंबईत BMW कारचा थरार! महिला चालकाने अनेक वाहनांना उडवले; पोलिसांशीही घातली हुज्जत

मुंबईतील जुहू परिसरात एका महिला चालकाने आपल्या अलिशान कारने अनेक वाहनांना धडक देऊन अपघात घडवल्याची धक्कादायक

मध्य रेल्वेवरील 9 एक्स्प्रेसचा सुपरफास्ट दर्जा रद्द, तिकीट दरातही होणार कमी

मुंबई: मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाने नऊ सुपरफास्ट

कोठडीतील मृत्यू प्रकरणांत वारसांना पाच लाखांची भरपाई, राज्य सरकारचे नवे धोरण लागू

मुंबई: पोलीस कोठडीत मारहाण, अत्याचार किंवा निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांना