दिवाळीच्या फराळातील चकली हा सर्वांचा आवडता पदार्थ आहे. तांदूळ, डाळी आणि विविध मसाल्यांपासून तयार होणारी चकली कुरकुरीत आणि खमंग असते. गोलाकार आकार आणि काटेरी नक्षी हे तिचे वैशिष्ट्य आहे.(Photo: AI)
2/10
पातळ पोहे, शेंगदाणे, डाळी, कढीपत्ता, खोबरे आणि मसाल्यांचा वापर करून चिवडा तयार केला जातो. गोडसर किंवा तिखट अशा दोन्ही प्रकारांत चिवडा बनवला जातो. चहासोबत खाण्यासाठी हा उत्तम फराळाचा पदार्थ आहे. (Photo: AI)
3/10
करंजी हा दिवाळीतील खास गोड पदार्थ आहे. रव्याचे किंवा मैद्याचे आवरण आणि त्यामध्ये खोबरे, साखर, खसखस, सुका मेवा यांचे सारण भरले जाते. अर्धचंद्राकार आकाराची करंजी चवीला गोड आणि खुसखुशीत असते.(Photo: AI)
4/10
बेसन, तूप आणि साखरेपासून तयार होणारे बेसनाचे लाडू दिवाळीच्या फराळातील लोकप्रिय गोड पदार्थ आहेत. बेसन मंद आचेवर भाजल्यामुळे त्याला छान सुगंध येतो. वेलची पूड घातल्याने त्याची चव आणखी वाढते. (Photo: AI)
5/10
अनारसे हा महाराष्ट्रातील पारंपरिक गोड पदार्थ आहे. भिजवलेले तांदूळ, गूळ किंवा साखर यांचा वापर करून त्याचे पीठ तयार केले जाते. वरून खसखस लावून ते तळले जातात. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसर असलेले अनारसे दिवाळीची खास ओळख आहेत. (Photo :AI)
6/10
मैदा, साखर, दूध आणि तूप यांपासून तयार होणारे शंकरपाळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. चौकोनी किंवा डायमंड आकारात कापून तळले जाणारे शंकरपाळे गोड आणि कुरकुरीत असतात. (Photo: AI)
7/10
चिरोटे हा थर असलेला पारंपरिक गोड पदार्थ आहे. मैद्याच्या पातळ पोळ्यांचे थर लावून त्यापासून चिरोटे तयार केले जातात. तळल्यानंतर त्यावर पिठीसाखर भुरभुरली जाते. त्याचे कुरकुरीत थर हेच त्याचे वैशिष्ट्य आहे. (Photo: AI)
8/10
बेसन, तिखट, हळद, मीठ आणि ओवा यांचा वापर करून शेव तयार केली जाते. साच्याच्या साहाय्याने पातळ धाग्यांसारखी शेव पाडून तळली जाते. चिवडा आणि फराळाच्या ताटात शेवला विशेष स्थान असते. (Photo: AI)
9/10
कडबोळी हा महाराष्ट्रातील पारंपरिक तिखट आणि कुरकुरीत पदार्थ आहे. भाजणीचे पीठ, तीळ, जिरे, ओवा आणि मसाल्यांचा वापर करून कडबोळी तयार केली जाते. गोलाकार वेटोळ्यासारखा आकार हे तिचे वैशिष्ट्य आहे. (Photo: AI)
10/10
रवा, साखर, तूप, वेलची आणि सुका मेवा यांपासून रवा लाडू तयार केले जातात. काही ठिकाणी त्यात ओले किंवा सुके खोबरेही घातले जाते. कमी वेळात तयार होणारा हा गोड पदार्थ दिवाळीच्या फराळात आवर्जून केला जातो. (Photo: AI)