Nashik : नाशिकच्या मुख्य बाजारपेठेत 3 ते 11 नोव्हेंबरपर्यंत वाहतूक बदल, 7 मार्गांवर प्रवेश बंद

Nashik : दिवाळी सणाचे खरेदी-विक्री निमित्ताने नाशिक शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ भागात मोठ्या प्रमाणात नागरिक व त्यांच्या वाहनांची गर्दी होत असते. त्यामुळे ३ नोव्हेंबर २०२६ ते ११ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मुख्य बाजारपेठेतील मार्गांवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नागरिकांच्या सोयीसाठी सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करून वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.


ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना नाशिक शहराचे पोलीस उप आयुक्त (मुख्यालय/वाहतूक) चंद्रकांत गवळी यांनी २ नोव्हेंबर २०२६ रोजी निर्गमित केली आहे. सरकारवाडा व भद्रकाली पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मध्यवर्ती बाजारपेठा मेनरोड, रविवार कारंजा, शालीमार, सांगली बँक परिसरामध्ये दिवाळी खरेदी-विक्रीसाठी नागरिक, व्यावसायिक व त्यांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे, हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ३ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर २०२६ दरम्यान दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत खालील मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना ‘प्रवेश बंद’ करण्यात येत असून सदरचे ७ मार्ग ‘वाहनविरहित’ करण्यात येत आहेत.



प्रवेश बंद मार्ग


मालेगाव स्टॅण्ड ते रविवार कारंजा कडे जाणाऱ्या-येणाऱ्या सर्वप्रकारच्या मालवाहू वाहनांना प्रवेश बंद.


दिल्ली दरवाजा ते धुमाळ पॉईंट कडे जाणाऱ्या-येणाऱ्या सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.


रोकडोबा मैदान ते साक्षी गणेश मंदिर, भद्रकाली कडे जाणाऱ्या-येणाऱ्या सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.


बादशाही कॉर्नर ते गाडगे महाराज पुतळा कडे जाणाऱ्या-येणाऱ्या सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.


नेपाळी कॉर्नर – गा.म. पुतळा – मेनरोड – धुमाळ पॉईंट कडे जाणाऱ्या-येणाऱ्या सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.


सांगली बँक सिग्नल ते धुमाळ पॉईंट कडे जाणाऱ्या-येणाऱ्या सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.


रविवार कारंजा ते धुमाळ पॉईंट कडे जाणाऱ्या-येणाऱ्या सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.



पर्यायी मार्ग


मालेगाव स्टॅण्ड – मखमलाबाद नाका – रामवाडी – बायजाबाई छावणी – चोपडा लॉज – गंगापूर नाका या मार्गे इतर वाहने जातील व येतील.


पंचवटीकडून मेन मार्केटकडे येणारी वाहने संतोष टी पॉईंट, द्वारका मार्गे इतरत्र जातील व येतील.


जुने नाशिक परिसरात जाण्या-येण्यासाठी सीबीएस – शालीमार – खडकाळी सिग्नल – सारडा सर्कल या मार्गाचा वापर करावा.


वाहनचालकांनी गर्दीची ठिकाणे सोडून इतर तत्सम पर्यायी मार्गांचा अवलंब करावा.


वर नमूद मार्गांत व वेळेत परिस्थितीनुसार ऐनवेळी कोणतीही पूर्वसूचना न देता बदल करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आलेले आहेत.



पार्किंग व्यवस्था


बी.डी. भालेकर मैदान,शालीमार


रविवार कारंजा


गोदाघाट तसेच गाडगे महाराज पुलाखाली


स्मार्ट सिटीच्या मार्किंग केलेल्या पार्किंगमध्ये


खरेदीसाठी मुख्य बाजारपेठांमध्ये येणारे वाहनचालकांनी आपली वाहने वर नमूद पार्किंगचे ठिकाणी पार्क करावीत.



वरील सर्व प्रकारचे निर्बंध हे पोलीस सेवेकरीता असलेली वाहने, अग्निशमन दलाची वाहने, शववाहिका, रुग्णवाहिका, तसेच अत्यावश्यक व आपत्कालीन सेवेची वाहने यांना लागू राहणार नाहीत. सदर अधिसूचना ३ नोव्हेंबर २०२६ पासून अंमलात येणार असून ३ ते ११ नोव्हेंबर २०२६ पावेतो प्रत्येक दिवशी सकाळी १० ते रात्री १० पावेतो ९ दिवस अंमलात राहील. अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

Comments
Add Comment

Amit Shah Hyderabad Rally : राहुल गांधी आणि काँग्रेसच्या 'अराजकते'विरोधात हैदराबादमध्ये अमित शाह यांचा धडक मोर्चा; भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन

हैदराबाद : काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाकडून देशातील संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचे व

मुंबईसह महाराष्ट्रातून ‘घाण’ साफ करायची असेल, तर हिंदूंना एकत्र यावेच लागेल! - मंत्री नितेश राणे

मुंबई : बांगलादेशी, रोहिंग्यांसह सर्व ‘घाण’ मुंबई आणि महाराष्ट्रातून साफ करायची असेल, तर हिंदूंनी एकत्र येणे

Mumbai Bengaluru Vande Bharat Express: CCTV, लॉक दरवाजे अन् स्वच्छ टॉयलेट! ट्रॅव्हल क्रिएटरने सांगितला अनुभव

नवीन बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस केवळ तिच्या वेग आणि आधुनिक रुपामुळेच नाही तर इतरही कारणांमुळे

Nursing Admission 2026: नर्सिंगच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठा निर्णय; प्रवेशाची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर

Nursing Admission 2026:  राज्यातील विविध नर्सिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्रता निकष पुन्हा एकदा शिथिल करण्यात आले

Delhi NCR Firecrackers : दिवाळीत दिल्लीकरांना मोठा दिलासा! सर्वोच्च न्यायालयाकडून 'ग्रीन फटाके' फोडण्यास परवानगी; वेळ आणि कडक नियमावली जाहीर

नवी दिल्ली : दिवाळीच्या तोंडावर दिल्ली आणि संपूर्ण राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (Delhi-NCR) वाढणारे हवेचे प्रदूषण

भुवनेश्वर कुमारची क्रिकेट कारकिर्द संपली? पहिलं षटकं सोडलं तर वाईट स्थिती, न्यूझीलंडविरुद्ध असं घडलं

[caption id="attachment_1071471" align="aligncenter" width="800"] भुवनेश्वर कुमारने चार वर्षानंतर भारतीय संघात कमबॅक केल्याने जोरदार चर्चा रंगली होती.