भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला विशेष महत्त्व आहे. सण-उत्सव, लग्नसराई किंवा धनत्रयोदशीसारख्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करण्याला अनेक कुटुंबांमध्ये प्राधान्य दिले जाते. मात्र, सोन्याचे वाढते दर पाहता ग्राहकांनी दागिने खरेदी करताना अधिक सावध राहणे गरजेचे आहे. अनेकदा ग्राहक दागिन्यांवर हॉलमार्क असल्याचे पाहून त्याची शुद्धता योग्य असल्याचे गृहीत धरतात. पण केवळ हॉलमार्क पाहणे पुरेसे नाही. त्यावरील BIS लोगो, सोन्याची शुद्धता आणि सहा अंकी HUID क्रमांक तपासणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मग सोने खरेदी करताना नेमक्या कोणत्या गोष्टी तपासाव्यात? बनावट हॉलमार्क कसा ओळखावा? जाणून घेऊया सविस्तर माहिती.
सर्वप्रथम BIS हॉलमार्क तपासा
सोने खरेदी करताना सर्वात आधी दागिन्यावरील BIS हॉलमार्क तपासणे आवश्यक आहे. BIS म्हणजे Bureau of Indian Standards. ही भारतातील अधिकृत मानक संस्था आहे. सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता निश्चित करण्यासाठी BIS हॉलमार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. हॉलमार्किंगमुळे ग्राहकांना दागिन्यात किती प्रमाणात शुद्ध सोने वापरले आहे, याची माहिती मिळते. त्यामुळे दागिना खरेदी करताना त्यावर अधिकृत BIS लोगो आहे की नाही, हे पाहावे. केवळ दुकानदाराने सांगितले म्हणून दागिना शुद्ध असल्याचे मानू नये.(GOLD PURITY TEST)
Benjamin Netanyahu : अमेरिका आणि इराण यांच्यात राजनैतिक चर्चा सुरू असतानाच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ...
सोन्याचे कॅरेट आणि फाइननेस समजून घ्या
सोने खरेदी करताना कॅरेट हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजली जाते. कॅरेट जितके जास्त, तितके सोन्याचे प्रमाण अधिक असते.
सोन्याच्या वेगवेगळ्या प्रकारांची शुद्धता पुढीलप्रमाणे असते:
24 कॅरेट सोने: साधारण 99.9 टक्के शुद्धता (999 फाइननेस)
22 कॅरेट सोने: 91.6 टक्के शुद्धता (916 फाइननेस)
23 कॅरेट सोने: 95.8 टक्के शुद्धता (958 फाइननेस)
20 कॅरेट सोने: 83.3 टक्के शुद्धता (833 फाइननेस)
18 कॅरेट सोने: 75 टक्के शुद्धता (750 फाइननेस)
14 कॅरेट सोने: 58.5 टक्के शुद्धता (585 फाइननेस)
साधारणपणे दागिने तयार करण्यासाठी 22 आणि 18 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. 24 कॅरेट सोने तुलनेने मऊ असल्याने दागिने तयार करण्यासाठी त्याचा वापर मर्यादित असतो.
सहा अंकी HUID नंबर तपासायला विसरू नका
सोन्याच्या दागिन्यांवरील HUID क्रमांक हा त्याच्या अस्सल हॉलमार्किंगची पडताळणी करण्यासाठी महत्त्वाचा आहे. HUID म्हणजे Hallmark Unique Identification Number. हा सहा अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांक असतो. म्हणजेच यामध्ये इंग्रजी अक्षरे आणि अंकांचा समावेश असतो. 1 जुलै 2021 पासून नवीन HUID आधारित हॉलमार्किंग पद्धत सुरू करण्यात आली. प्रत्येक हॉलमार्क केलेल्या दागिन्याला स्वतंत्र HUID क्रमांक दिला जातो. त्यामुळे दागिन्याची ओळख आणि त्याची माहिती तपासणे शक्य होते. खरेदी करताना दागिन्यावरील हा क्रमांक स्पष्टपणे तपासा.(HOW TO CHECK REAL GOLD)
Crime News: महादेव ऑनलाइन सट्टेबाजी ॲप प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या सौरभ चंद्राकर याला सीबीआयने ओमानमधून भारतात आणले आहे. केंद्रीय ...
BIS Care App वरून घरबसल्या कशी कराल पडताळणी?
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी ग्राहकांना BIS Care App ची मदत घेता येते. हे BIS या संस्थेचे अधिकृत मोबाइल अॅप आहे.यामध्ये 'Verify HUID' हा पर्याय उपलब्ध आहे.
पडताळणी कशी कराल?
सर्वप्रथम मोबाइलमध्ये BIS Care App उघडा
त्यानंतर 'Verify HUID' हा पर्याय निवडा
दागिन्यावरील सहा अंकी HUID क्रमांक टाका
त्यानंतर स्क्रीनवर उपलब्ध होणारी माहिती तपासा
दागिन्याचा प्रकार, शुद्धता, ज्वेलर आणि हॉलमार्किंग सेंटरची माहिती दागिन्याशी जुळते का ते पाहा
जर अॅपमध्ये दिसणारी माहिती आणि प्रत्यक्ष दागिन्याची माहिती जुळत नसेल, तर खरेदी करण्यापूर्वी दुकानदाराकडे स्पष्टीकरण मागावे
सोन्याचे वजन आणि पक्के बिल कसे तपासाल?
सोने खरेदी करताना केवळ दागिन्याचे डिझाइन आणि किंमत पाहू नका. त्याचे वजन आणि बिलातील तपशीलही तपासणे गरजेचे आहे.
बिलामध्ये पुढील गोष्टी स्पष्टपणे नमूद असतात:
दागिन्याचे नाव आणि वर्णन
सोन्याचे निव्वळ वजन
सोन्याची शुद्धता आणि कॅरेट
प्रति ग्रॅम सोन्याचा दर
मेकिंग चार्जेस
हॉलमार्किंग शुल्क
दागिन्यांमध्ये खडे, मोती किंवा इतर धातूंचा वापर केला असल्यास त्यांचे वजन आणि किंमत वेगळी समजून घ्यावी. सोन्याचे निव्वळ वजन आणि संपूर्ण दागिन्याचे वजन यामध्ये फरक असू शकतो. तसेच खरेदी केल्यानंतर पक्के बिल घेणे विसरू नका. भविष्यात दागिन्याबाबत काही तक्रार किंवा वाद निर्माण झाल्यास हे बिल महत्त्वाचे ठरते.