Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईत उद्या 10 तास पाणी पुरवठा बंद, ऐरोलीसह वाशी अन्... परिसरांना बसणार फटका

नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रामध्ये, उद्या 10 तासांचा वॉटर शटडाऊन ठेवण्यात आला आहे. या काळात महापालिकेने मोरबे जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम घेतले आहे. पालिकेने नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.

नवी मुंबई: नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रामध्ये 3 नोव्हेंबर अर्थात उद्या सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत अशा 10 तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळामध्ये महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने पाणी पुरवठाविषयक कामं हाती घेण्याचे ठरवले आहे. मोरबे मुख्य जलवाहिनीचे काम हाती घेण्यात येणार आहे. शहरातील वेगवेगळ्या परिसरामध्ये हे महत्त्वाचे काम हाती घेण्यात येणार आहे. कोणकोणत्या परिसराला ह्या पाणीपुरवठा बंदचा फटका बसणार आहे, जाणून घेऊया...



नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत मंगळवारी 3 नोव्हेंबर 2026 रोजी पाणीपुरवठा विषयक महत्वाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये, सानपाडा येथील मोराज सर्कल जवळील मोरबे मुख्य जलवाहिनीला जोडलेल्या वितरण जलवाहिनीवर 400 मि.मी. व्यासाचे बटरफ्लाय व्हॉल्व्ह (Butterfly Valve) बसवण्याचे काम घेतले जाणार आहे. सानपाडा सेक्टर- 30 मध्ये सामना प्रेस जवळील मोरबे मुख्य जलवाहिनीला जोडलेल्या वितरण जलवाहिनीवर 250 मि.मी. व्यासाचे स्लुईस व्हॉल्व्ह (Sluice Valve) बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. वाशी सेक्टर- 19 येथील सतरा प्लाझा जवळील (ए.पी.एम.सी मार्केट) मोरबे मुख्य जलवाहिनीला जोडलेल्या वितरण जलवाहिनीवर 250 मि.मी. व्यासाचे स्लुईस व्हॉल्व्ह (Sluice Valve) बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.


 


शिवाय, वाशी सेक्टर- 29 येथील मोरबे मुख्य जलवाहिनीला जोडलेल्या वितरण जलवाहिनीवर 700 मि.मी. व्यासाचे बटरफ्लाय व्हॉल्व्ह (Butterfly Valve) बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. बेलापुर सेक्टर- 28 पंपहाऊस मधील पंपाना जोडणारे 700 मि.मी. व्यासाचा Inlet चे बटरफ्लाय व्हॉल्व्ह (Butterfly Valve) बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. बेलापुर सेक्टर- 15 किल्ला जंक्शन येथील मोरबे मुख्य जलवाहिनीला जोडलेल्या वितरण जलवाहिनीवर 900 मि.मी. व्यासाचे बटरफ्लाय व्हॉल्व्ह (Butterfly Valve) बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. शिरवणे गावाजवळील 800 मी.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला जोडलेल्या वितरण वाहिनीवर 4 फ्लोमीटर बसवण्याचे काम सुद्धा त्याच दरम्यान केले जाणार आहे.



नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रात, पाणीपुरवठा विषयक कामे करण्यासाठी मंगळवारी, 3 नोव्हेंबर 2026 रोजी, सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत, एकूण 10 तासांच्या काळासाठी मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणी पुरवठा बंदच्या काळात, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे- सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या विभागांमधील संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शिवाय, सिडको क्षेत्रातील खारघर आणि कामोठे नोडमधील पाणीपुरवठा सुद्धा बंद राहणार आहे. तर, बुधवारी दिनांक 4 नोव्हेंबरचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा महानगर पालिकेने दिली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, पाणी पुरवठा बंदच्या काळात पाण्याचा जपून वापर करत महानगरपालिकेला सहकार्य करावे.

Comments
Add Comment

मेरिटाईम क्षेत्रात महाराष्ट्र देशातील सर्वाधिक गुंतवणूकदारस्नेही राज्य - मंत्री नितेश राणे यांचा विश्वास

मुंबई : "जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि बंदर विकास क्षेत्रात महाराष्ट्राला देशातील आघाडीचे केंद्र बनविण्याच्या

Mumbai Pollution : प्रदुषण नियंत्रणासाठी मुंबई कुठे कमी पडतेय सांगाल?

सचिन धानजी जगाच्या पाठिवर वायू प्रदुषणाची आणि धुळीच्या प्रदुषणाची समस्या फक्त मुंबईतच आहे, असं जे काही चित्र

Bhandup : भांडुपमध्ये लग्नाच्या जेवणातून 30 जणांना विषबाधा; नवविवाहित जोडप्यासह वऱ्हाडी रुग्णालयात दाखल

Mumbai News: लग्नसमारंभातील भोजनानंतर नवविवाहित जोडप्यासह वऱ्हाडी मंडळींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना

Nita Ambani : नीता अंबानींचा मोठा सामाजिक उपक्रम! कर्जतमध्ये 100 एकरांवर उभारणार ‘अनंत आश्रय’; 5 हजारांहून अधिक जणांना मिळणार निवारा

Mumbai News: रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून नीता अंबानी यांनी आणखी एका मोठ्या सामाजिक उपक्रमाची घोषणा केली आहे.

BMC New Building : मुंबई महापालिकेचे नवीन सभागृह 2029 मध्ये; टाऊन हॉल, जिमखान्यासह उभारणार नवी वास्तू

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा

मुंबईतील 3,000 प्रदूषण मोजमाप LED फलकांची तपासणी होणार; महापालिकेचे थर्ड पार्टी ऑडिट

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील बांधकामाच्या ठिकाणी प्रदुषण नियंत्रणाच्या उपाययोजनांचा भाग म्हणून हवेच्या