स्वदेशी बनावटीच्या पहिल्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम किती पूर्ण झालं? 'या' अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे ट्रेन

मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन बंगळूरूमध्ये आकार घेत आहे. देशाचे रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेनचं सुरू असलेल्या बीईएमएल (BEML) कारखान्यामध्ये भेट दिली.

नवी दिल्ली: देशामध्ये तयार होणाऱ्या पहिल्या स्वदेशी बुलेट ट्रेनचे काम प्रगती पथावर आहे. यामुळे देशातील रेल्वे क्षेत्रामध्ये एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन सध्या आकार घेत आहे. देशाचे रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी बंगळूरूमध्ये बुलेट ट्रेनचं सुरू असलेल्या बीईएमएल (BEML) कारखान्यामध्ये भेट दिली. यावेळी त्यांनी भेट घेत, देशामध्ये बनत असलेल्या 'मुंबई- अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन'च्या कामाची पाहणी केली. बुलेट ट्रेनच्या माध्यमातून देश हायस्पीड रेल्वे तंत्रज्ञानामध्ये भारताचं पाऊल मजबूत करतंय. कर्नाटकातल्या बंगळूरूमधील, बीईएमएल (BEML) च्या कारखान्यामध्ये हायस्पीड बुलेट ट्रेन बनवण्याचं काम सुरू आहे.



बुलेट ट्रेन म्हणजे प्रगत अभियांत्रिकी आणि स्वदेशी कौशल्य यांचा मेळ असून प्रवाशांच्या सोयी- सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन भारतीय परिस्थितीनुसार ही ट्रेन तयार केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा 2027मध्ये सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतू याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. भारतीय बनावटीची पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन, B- 28, तयार केली जात आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्रेनच्या बांधकामादरम्यान वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा मानकांची पाहणी केली. त्यांनी या हाय- स्पीड ट्रेनच्या बांधकामात वापरण्यात येणारी आधुनिक यंत्रसामग्री, विशेष उपकरणे आणि तांत्रिक प्रक्रियांचा आढावा घेतला.



रेल्वेमंत्र्यांनी कोच अंडरफ्रेम, साइडवॉल, छप्पर आणि कार बॉडी असेंब्लीसह उत्पादनाच्या विविध टप्प्यांची पाहणी केली. ट्रेनच्या तपासणीसाठी करण्यात आलेल्या स्क्वीझ टेस्टलाही त्यांनी हजेरी लावली. त्यांनी प्रवासी आसने, एसीची आरामदायी सुविधा, कपलर आणि इतर महत्त्वाच्या घटकांचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला. शिवाय, रेल्वेमंत्र्यांनी साइड मॉड्यूल्स आणि रूफ मॉड्यूल्सच्या उत्पादन आणि असेंब्ली प्रक्रियेचाही आढावा घेतला. या ट्रेनची कमाल टेस्ट स्पीड जरी दर ताशी 280 किमी असला तर ऑपरेशनल स्पीड हा दर ताशी 249 किमी असणार आहे. एकंदरित या ट्रेनची संपूर्ण लांबी 202 मीटर असेल, या ट्रेनला 8 डब्बे असणार असून त्यातील चार डबे मोटर कार आणि 4 ट्रेलर कार असणार आहेत. ट्रेनमध्ये 557 प्रवासी बसतील इतकी आसन क्षमता आहे. दिव्यांगजन प्रवाशांसाठी खास सोयींची आसनं सुद्धा उपलब्ध करण्यात येणार आहेत.


 


बुलेट ट्रेनमध्ये, 7 डबे जनरल क्लासचे आणि एक डबा एक्झिक्युटिव्ह क्लासचा असेल. जनरल क्लासमध्ये 3×2 सिटींग सिस्टीमचे असेल आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये 2×2 सिटिंग सिस्टीम असेल. ट्रेनमध्ये दोन्ही बाजूंना ड्रायव्हर कॅब असणार आहे. भविष्यामध्ये, दोन आठ डब्यांच्या ट्रेनचे रूपांतर 16 डब्यांच्या ट्रेन करण्याची योजना करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या दृष्टीने आराम आणि अत्याधुनिक सोयी- सुविधांकडे विशेष लक्ष देत बुलेट ट्रेनची निर्मिती करण्यात येणार आहे. भारतीय प्रवाशांना नजरेसमोर ठेवून ट्रेनची रचना करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या आरामाला प्राधान्य देत, गाडीमध्ये अर्गोनॉमिक पद्धतीने डिझाईन केलेले आसने असतील. पाय ठेवण्यासाठीही पुरेशी जागा, एलईडी लाईटिंगसाठी खास योजना, सामानासाठी ओव्हरहेड रॅक आणि मोठ्या सामानासाठी स्वतंत्र स्टँड्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे.



प्रत्येक सिटजवळ रुंद खिडकी, मोबाईल फोन आणि लॅपटॉप चार्ज करण्यासाठी पॉवर आउटलेट्स, आधुनिक बायोडायजेस्टर टॉयलेट, डब्यात एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जाण्यासाठी सिंगल पीस गँगवे, सोबतच प्रवाशांना एका डब्यातून दुसऱ्या डब्यात सहजपणे जाता येईल, अशी सुविधा सुद्धा करण्यात आली आहे. असे अनेक अत्याधुनिक गोष्टींनी सुसज्ज अशी ही मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन आहे. या ट्रेनमुळे 508 किमीचा हायस्पीड मार्ग अवघ्या काही तासामध्ये पार करणे, शक्य होणार आहे.

Comments
Add Comment

अतिवृष्टी व पूरबाधित शेतकऱ्यांना 291 कोटींची मदत, मदत- पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांची माहिती

मुंबई: यंदाच्या वर्षी राज्य सरकारने जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये, अतिवृष्टी आणि पुरबाधित शेतकऱ्यांना किती कोटींची

मत्स्यव्यवसाय विभागाच्या 24 योजनांचा लाभ आता ऑनलाइन; मंत्री नितेश राणेंचे आवाहन

राज्यातील सर्व मत्स्यकास्तकार, मच्छीमार, मत्स्यव्यावसायिक आणि मच्छीमार संस्थांनी महाडीबीटी 2.0 (https://mahadbt2.maharashtra.gov.in/)

देशातील पहिले रस्ते सुरक्षा संशोधन व प्रशिक्षण केंद्र सासवड येथे उभारणार! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून प्रकल्पाची पाहणी

देशातील पहिले रस्ते सुरक्षा संशोधन व प्रशिक्षण केंद्र (Road Safety Training and Research Institute) सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे येथे उभारण्यात

Mahalakshmi Express : महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये मध्यरात्री लूटमार; सिग्नल यंत्रणेत छेडछाड करून महिलांचे दागिने लंपास

 Mahalakshmi Express : मुंबईहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये मध्यरात्री लूटमारीची घटना घडली आहे.

Satara District Court Bomb Threat : सातारा जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; न्यायालय परिसर रिकामा

Satara District Court Bomb Threat : सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल मिळाल्याने सोमवारी

Diwali special buses : दिवाळीसाठी पुणे एसटी विभाग सज्ज! 900 जादा बस धावणार; आतापर्यंत 300 बसचे आरक्षण पूर्ण

 Diwali special buses : दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे एसटी विभागाने विशेष नियोजन केले