न्यायालयात येणाऱ्या वाहनांची तपासणी
धमकीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. न्यायालय परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. बॉम्बशोधक व नाशक पथकासह पोलिसांकडून परिसराची सुरक्षितता तपासली जात आहे.
Nashik : ग्राहकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न देण्याच्या नियमांना हरताळ फासणारा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. मुंबई-आग्रा महामार्गालगत ...
धमकीच्या ई-मेलमुळे खळबळ
न्यायालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणाला धमकी मिळाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धमकीचा ई-मेल नेमका कोणी पाठवला, त्यामागील कारण काय आणि संदेशाची सत्यता काय, याबाबत तपास यंत्रणांकडून पडताळणी केली जात आहे. दरम्यान, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलिस प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.