Nashik Crime : नाशिकमध्ये किरकोळ वादातून कोयत्याने हल्ला, पती-पत्नीसह 17 वर्षीय मुलगा गंभीर जखमी

Nashik Crime : जुन्या सिडकोतील तुळजाभवानी चौक परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने कोयत्याने एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली. या हल्ल्यात पती-पत्नीसह त्यांचा १७ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला असून, या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित आरोपी श्रावण राबडे याला अटक केली आहे.



नेमकं काय घडलं ?


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळजाभवानी चौकात रस्त्यावर सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. संशयित आरोपी श्रावण राबडे याने काहीतरी कारण काढून निकम कुटुंबीयांशी वाद घातला. त्यानंतर त्याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने संदीप निकम (वय ५०) आणि त्यांचा मुलगा अर्णव निकम (वय १७) यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.



अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


दरम्यान, पती आणि मुलाला वाचवण्यासाठी मानसी निकम या धावून गेल्या असता आरोपीने त्यांच्यावरही कोयत्याने वार केले. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी मानसी निकम यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी श्रावण राबडे याला अटक केली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रताप गिरी करीत आहेत.

Comments
Add Comment

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचा पिवळ्या साडीतील मोहक अंदाज; सौंदर्य आणि अदांनी चाहत्यांना घायाळ केलं!

[caption id="attachment_1071867" align="alignnone" width="800"] काही दिवसांपूर्वीच कोण होणार करोडपती हा शो सुरू झाला. या शोमध्ये यावेळी प्रथमच महिला

Tribal Development: आदिवासी बांधवांसाठी 16 जिल्ह्यांत आधार, जन्मदाखल्यांची विशेष मोहीम

मुंबई (सुहास शेलार): शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले आधार कार्ड आणि जन्मदाखले उपलब्ध नसल्याने

Gautami Patil : वडिलांबद्दल खंत व्यक्त करताना गौतमी पाटीलची मोठे वक्तव्य म्हणाली, मी माझ्या वडिलांना...

Gautami Patil : "सबसे कातिल गौतमी पाटील..." या एका वाक्यावर संपूर्ण महाराष्ट्र थिरकतो. जिथे गौतमीचा कार्यक्रम, तिथे गर्दी आणि

अवघ्या 35 धावांत दोन धक्के, पण जैस्वाल- राठोडची वादळी खेळी! 247 धावांची भागीदारी करत भारताला तारलं

मुंबई: न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्चमध्ये भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यात खेळला गेलेला दुसरा अनौपचारिक कसोटी

भव्य स्टारकास्ट, थरारक कथा! ‘जय श्री राम’ मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात

अयोध्येत प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर उभं राहिलं आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये घडली एक अशी घटना,जिने अनेकांचं

Nashik Simhastha Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्याची संपूर्ण माहिती भाविकांना एकाच क्लिकवर, नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याची अधिकृत वेबसाईट लाँच

नाशिक: सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी राज्य सरकारसह जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. सिंहस्थ कुंभमेळा