Gautami Patil : वडिलांबद्दल खंत व्यक्त करताना गौतमी पाटीलची मोठे वक्तव्य म्हणाली, मी माझ्या वडिलांना...

अलीकडेच गौतमीने तिच्या वडिलांबद्दल मोठा खुलासा केला. वडील समोर बसलेले असताना देखील गौतमीला तिच्या वडिलांना ओळखता आलं नाही, तर वडिलांना देखील माहिती नव्हतं, की समोर बसलेली त्यांची मुलगी आहे.

Gautami Patil : "सबसे कातिल गौतमी पाटील..." या एका वाक्यावर संपूर्ण महाराष्ट्र थिरकतो. जिथे गौतमीचा कार्यक्रम, तिथे गर्दी आणि चाहत्यांचा राडा, हे झालाच पाहिजे हे समीकरण आता नवीन राहिलं नाही. गौतमी पाटील हिचं नाव जरी घेतलं तरी, अनेकांना तिचा डान्स आठवतो. स्टेजवर गौतमी प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसते. पण तिच्या वैयक्तिक आयुष्यात तिने आतापर्यंत अनेक चढ- उतारांना सामोरी गेली आहे.


गौतमीला आज आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. पण तिच्यासाठी हा प्रवास फार कठीण होता. परिस्थिती बिकट असल्यामुळे गौतमी फक्त 10 वीच शिकली आहे, त्यात वडिलांची नसलेली साथ गौतमी आणि तिच्यासाठी आईसाठी फार मोठा संघर्ष होता. अलीकडेच गौतमीने तिच्या वडिलांबद्दल मोठा खुलासा केला. वडील समोर बसलेले असताना देखील गौतमीला तिच्या वडिलांना ओळखता आलं नाही, तर वडिलांना देखील माहिती नव्हतं, की समोर बसलेली त्यांची मुलगी आहे.


एका मुलाखती दरम्यान गौतमी पाटीलने सांगितले, ‘मला माहिती नव्हतं माझे वडील कोण आहे, त्यांना मी ओळखत ही नव्हती. कारण माझ्या वडिलांना मी कधी पाहिलंच नाही. गौतमीच्या जन्माआधीच तिचे आई-वडील वेगळे झाले होते. त्यामुळे वडिलांचं नाव माहीत असूनही त्यांचं प्रेम तिला कधीच मिळालं नाही. गौतमी लहानपणापासून तिच्या आईसोबतच राहते. तसेच तिचा सांभाळ आजोबांनी केला असल्याचे देखील गौतमीने सांगितले. आईचे वडील, आई आणि मी गावाकडे राहत होतो. वडिलांकडे तर मी कधी गेलेच नाही… आजोबांनीच मला लहानाचं मोठं केलं. पण कुटुंबाचा विचार असायचाच. पुढे माझ्या आईचं काय होईल, माझं काय होईल. म्हणून मी आठवीत असताना माझ्या बाबांनी वडिलांना बोलावून घेतेलं…’



तेव्हा माझ्या आजोबांनी मला विचारलं ‘हे कोण आहेत?’, तसेच माझ्या वडिलांना देखील विचारलं, ‘या आठवीतल्या मुलीला ओळखता का?’ मी माझ्या वडिलांना ओळखत नव्हती… माझ्या समोर बसलेले माझे वडील आहे, हे मला माहिती नव्हते. कारण मी माझ्या वडिलांना कधी पहिलेच नव्हते. तेव्हा मी आईकडे खूप रडले, की माझे वडील कोण आहेत? कारण शाळेत सर्वांचे वडील यायचे, फक्त माझे वडील नसायचे. तेव्हा मी आईला विचारायचे देखील माझे वडील कुठे आहेत. तेव्हा मला कारण सांगून मला आईने समजावलं.


पुढे बोलताना, ‘माझ्या मामाने आम्हाल पुण्यात आणलं, म्हणजे मला, माझ्या आई – वडिलांना.. इकडे एकत्र राहा आणि नव्याने सुरुवात करा या हेतूने… पण माझे वडील कधी सुधारलेच नाहीत. ते सतत माझ्या आईला मारायचे. मी शाळेत, क्लासला गेले तर, ते माझ्या मागे यायचे, मी कुठे जात आहे पाहण्यासाठी. तेव्हा बोलायचे ही माझी मुलगी नाही. नशेत असायचे म्हणून बोलायचे… पण माझ्या आईने प्रत्येक वेळेस फक्त माझा विचार केला. आई शांत राहायची. आज जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा जाणवतं की माझ्या त्या प्रश्नांनी आईला किती त्रास झाला असेल. पण तिने मोठ्या संयमाने मला सांभाळलं.

Comments
Add Comment

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचा पिवळ्या साडीतील मोहक अंदाज; सौंदर्य आणि अदांनी चाहत्यांना घायाळ केलं!

[caption id="attachment_1071867" align="alignnone" width="800"] काही दिवसांपूर्वीच कोण होणार करोडपती हा शो सुरू झाला. या शोमध्ये यावेळी प्रथमच महिला

भव्य स्टारकास्ट, थरारक कथा! ‘जय श्री राम’ मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात

अयोध्येत प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर उभं राहिलं आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये घडली एक अशी घटना,जिने अनेकांचं

Rashmika Mandanna Mysaa : रश्मिका मंदानाच्या 'मायसा' चित्रपटातील 'ओ मायसा रे' गाणे रिलीज; अभिनेत्रीचा संताप आणि रागीट अवतार पाहून चाहते झाले अवाक!

मुंबई : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिचा आगामी आणि अतिशय उत्सुकतेचा विषय असलेला

Ramayana Advance booking : ‘रामायण’चा बॉक्स ऑफिसवर धमाका ! वर्ल्डवाइड अ‍ॅडव्हान्स बुकिंग 115 कोटींच्या पार

मुंबई : रणबीर कपूर, यश, साई पल्लवी आणि सनी देओल यांसारख्या दिग्गज कलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण:

Jiya Shankar Breakup Rumours: 'हे काही बॉलीवूडचे चित्रपट नाही'... जिया शंकरचे ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम

Jiya Shankar Breakup Rumours: 'वेड' फेम अभिनेत्री जिया शंकर नेहमीच चर्चेचा विषय असते. कधी तिच्या ग्लॅमर लूकने तर कधी तिच्या पर्सनल

Bollywood News : '5 कोटी दे नाहीतर....' अभिनेत्याला थेट धमकीचा फोन ; टायगर श्रॉफनंतर आणखी एक बॉलिवूड अभिनेता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर ?

Bollywood News : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच बॉलिवूडच्या आणखी एका