भव्य स्टारकास्ट, थरारक कथा! ‘जय श्री राम’ मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीनंतर पाकिस्तानमध्ये घडलेली एक अनपेक्षित आणि धक्कादायक घटना आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. ‘जय श्री राम’ हा भव्य मराठी चित्रपट आता मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज होत आहे.

अयोध्येत प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर उभं राहिलं आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये घडली एक अशी घटना,जिने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं! नेमकं काय घडलं होतं? या चित्तथरारक घटनेमागची कहाणी काय आहे? अशाच अनेक प्रश्नांची उत्सुकता वाढवणारा ‘जय श्री राम’ हा भव्य मराठी चित्रपट आता मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज होत आहे. वेगळ्या विषयाची लक्षवेधक मांडणी आणि भव्य निर्मितीमूल्ये यांची उत्तम सांगड घालत या चित्रपटाच्या चित्रीकरणाची नुकतीच सुरुवात झाली.


‘सेव्हन ओशन स्टुडिओज’ आणि ‘अमोल कागणे स्टुडिओ प्रॉडक्शन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जय श्री राम’ या चित्रपटाची निर्मिती होत आहे. राम खाटमोडे आणि सागर पाठक या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. सहाय्यक दिग्दर्शक विनोद वणवे आहेत. मराठी, बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनुभवी व दमदार कलाकारांची भक्कम स्टारकास्ट ही या चित्रपटाचे विशेष आकर्षण आहे. वेगळ्या विषयाची निवड, भव्य निर्मितीमूल्ये आणि नामवंत कलाकारांची मांदियाळी यामुळे ‘जय श्री राम’ या चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे.



अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीनंतर पाकिस्तानमध्ये घडलेली एक अनपेक्षित आणि धक्कादायक घटना आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. नेमकी ती घटना काय होती? या घटनेचे कोणते अनपेक्षित पैलू पडद्यावर उलगडणार? आणि या कथेला कोणते नाट्यमय वळण मिळणार? अशा अनेक प्रश्नांची उत्सुकता त्यामुळे निर्माण झाली आहे. ‘जय श्री राम’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून पाकिस्तानमध्ये घडलेल्या त्या चित्तथरारक घटनेचा थरार रुपेरी पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षकांना आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Comments
Add Comment

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचा पिवळ्या साडीतील मोहक अंदाज; सौंदर्य आणि अदांनी चाहत्यांना घायाळ केलं!

[caption id="attachment_1071867" align="alignnone" width="800"] काही दिवसांपूर्वीच कोण होणार करोडपती हा शो सुरू झाला. या शोमध्ये यावेळी प्रथमच महिला

Gautami Patil : वडिलांबद्दल खंत व्यक्त करताना गौतमी पाटीलची मोठे वक्तव्य म्हणाली, मी माझ्या वडिलांना...

Gautami Patil : "सबसे कातिल गौतमी पाटील..." या एका वाक्यावर संपूर्ण महाराष्ट्र थिरकतो. जिथे गौतमीचा कार्यक्रम, तिथे गर्दी आणि

Rashmika Mandanna Mysaa : रश्मिका मंदानाच्या 'मायसा' चित्रपटातील 'ओ मायसा रे' गाणे रिलीज; अभिनेत्रीचा संताप आणि रागीट अवतार पाहून चाहते झाले अवाक!

मुंबई : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिचा आगामी आणि अतिशय उत्सुकतेचा विषय असलेला

Ramayana Advance booking : ‘रामायण’चा बॉक्स ऑफिसवर धमाका ! वर्ल्डवाइड अ‍ॅडव्हान्स बुकिंग 115 कोटींच्या पार

मुंबई : रणबीर कपूर, यश, साई पल्लवी आणि सनी देओल यांसारख्या दिग्गज कलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण:

Jiya Shankar Breakup Rumours: 'हे काही बॉलीवूडचे चित्रपट नाही'... जिया शंकरचे ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम

Jiya Shankar Breakup Rumours: 'वेड' फेम अभिनेत्री जिया शंकर नेहमीच चर्चेचा विषय असते. कधी तिच्या ग्लॅमर लूकने तर कधी तिच्या पर्सनल

Bollywood News : '5 कोटी दे नाहीतर....' अभिनेत्याला थेट धमकीचा फोन ; टायगर श्रॉफनंतर आणखी एक बॉलिवूड अभिनेता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर ?

Bollywood News : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच बॉलिवूडच्या आणखी एका