मुंबईकरांसाठी गुड न्यूज! Aqua Line च्या फेऱ्यांमध्ये वाढ; दोन मेट्रोंमधला वेळ कमी केला
Mumbai Metro 3 News: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने नोकरदारांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई मेट्रो 3 वरील मेट्रो फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार ते शुक्रवार या दिवसांतील मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2 नोव्हेंबरपासून 46 अतिरिक्त मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
November 3, 2026 03:40 PM
मुंबईकरांसाठी गुड न्यूज! Aqua Line च्या फेऱ्यांमध्ये वाढ; दोन मेट्रोंमधला वेळ कमी केला
1/6 मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मुंबई मेट्रो 3 ॲक्वा लाईनवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) ॲक्वा लाईनवरवरील फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
2/6 कालपासून अर्थात, सोमवार, 2 नोव्हेंबरपासून कामकाजाच्या दिवशी 46 अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मेट्रोच्या दैनंदिन फेऱ्यांची संख्या आता 291 वरून 337 पर्यंत झाली आहे. या निर्णयामुळे गर्दीच्या वेळेत प्रवाशांना मेट्रोसाठी कमी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे मेट्रो प्रशासनाला गर्दीचे व्यवस्थापन करणे अधिक सोपे होणार आहे.
3/6 ॲक्वा लाईनवरील प्रवासीसंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. ही वाढ लक्षात घेऊन एमएमआरसीने मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत दोन मेट्रो गाड्यांमधील अंतर 4 मिनिटे 50 सेकंदांवरून 4 मिनिटे 25 सेकंदांपर्यंत करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना कमी वेळेत मेट्रो उपलब्ध होणार असून, स्थानकांवरील गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होईल.
4/6 आरे जेव्हीएलआर ते कफ परेड या संपूर्ण मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर दैनंदिन फेऱ्यांची संख्या 271 करण्यात आली होती. त्यानंतर प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानुसार 23 जून 2026 रोजी फेऱ्यांची संख्या 28२, तर 28 सप्टेंबर 2026 रोजी 291 करण्यात आली. आता आणखी 46 फेऱ्यांची भर पडल्याने कामकाजाच्या दिवशी ही संख्या 337 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईकरांना अधिक वारंवार आणि सोयीस्कर मेट्रो सेवा उपलब्ध होणार आहे.
5/6 नवीन वेळापत्रकानुसार गर्दीच्या वेळेत दोन मेट्रो गाड्यांमधील अंतर 4 मिनिटे 25 सेकंद करण्यात आले आहे. मेट्रोची वारंवारता वाढल्यामुळे प्रवाशांना स्थानकांवर अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. तसेच गर्दीच्या वेळेत प्रवाशांचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. शनिवार आणि रविवारच्या दिवशी मात्र मेट्रो सेवा विकेंडच्या वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत.
6/6 मुंबईकरांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि कार्यक्षम मेट्रो सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एमएमआरसीकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. प्रवाशांची वाढती संख्या आणि त्यांच्या प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येत आहे. भविष्यातही प्रवासीसंख्या आणि सेवेची आवश्यकता लक्षात घेऊन मेट्रो फेऱ्यांच्या वेळापत्रकात आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत.