
मुंबई (सुहास शेलार): महाराष्ट्र पोलीस दलातील 15 आयपीएस आणि आरपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने जारी केले आहेत. त्याचप्रमाणे ठाणे शहर पोलीस दलातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. अमरसिंग जाधव, प्रशांत कदम आणि शिवराज पाटील यांचा त्यात समावेश आहे.(MAHARASHTRA POLICE)
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीत जत सोसायटी गटातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवला आहे. मिरजेतील ...
पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक एकच्या शिफारशीनुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. ठाणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव आणि परिमंडळ क्रमांक पाचचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच कोकण परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील शिवराज पाटील यांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या तपासाच्या पार्श्वभूमीवर अमरसिंग जाधव आणि प्रशांत कदम यांना मुदतवाढ दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या आदेशानुसार विकास संपत नाईक यांची नागपूर येथील नागरी हक्क संरक्षण विभागातून मुंबईतील राज्य गुप्तवार्ता विभागात अपर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संकेत सतीश गोसावी यांची पुणे येथील गुप्तवार्ता विभागातून रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारीपदी, तर कुमार भिकाजी चौधरी यांची लातूर जिल्ह्यातील औसा येथून नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत पोलीस उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. संतोष वैरागडे यांची दहशतवादविरोधी पथकातून नाशिकच्या मालेगाव कॅम्प उपविभागीय पोलीस अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. श्रीकांत चंद्रकांत कांकाळ यांची बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेतून छत्रपती संभाजीनगर येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीत बदली करण्यात आली आहे.(MAHARASHTRA GOVERNMENT)
पुणे: पुणेकरांची बहुप्रतीक्षित हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा अखेर सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या मेट्रो मार्गिकेचे ...
ठाणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांची बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी ठाणे शहर परिमंडळ क्रमांक एकच्या पोलीस उपायुक्त मीना मखवाना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जयंत बजबळे यांची ठाणे शहर पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आकांक्षा यादव यांची रत्नागिरी उपविभागातून लातूर जिल्ह्यातील औसा येथे उपविभागीय पोलीस अधिकारीपदी बदली झाली आहे. वैशाली ईश्वर कडुकर यांची सातारा येथील अपर पोलीस अधीक्षक पदावरून पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.






