Wednesday, November 4, 2026

Chief Minister Relief Fund : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अतुल सावे यांच्या मुलाचा विवाह साधेपणाने; मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटींची मदत

तसेच विवाहासाठी होणाऱ्या खर्चातील 1 कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे जाहीर केले आहे.

Maharashtra News: महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाई आणि पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी व ग्रामीण नागरिक संकटाचा सामना करत आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री अतुल सावे यांच्या कुटुंबीयांनी मुलाचा नियोजित भव्य विवाहसोहळा रद्द करून तो साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विवाहासाठी होणाऱ्या खर्चातील 1 कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे जाहीर केले आहे.

25 नोव्हेंबरला होणार होता विवाहसोहळा

अतुल सावे यांचे पुत्र अनुराग आणि ईशा यांचा विवाह 25 नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटामाटात आयोजित करण्याचे नियोजन होते. मात्र, राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती आणि शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा सोहळा साधेपणाने करण्याचा निर्णय घेण्यात आला.

परिसरातील नागरिक संकटात असताना मोठा उत्सव साजरा करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका वधू-वरांच्या कुटुंबीयांनी घेतली. त्यामुळे विवाह केवळ कौटुंबिक वातावरणात आणि साध्या पद्धतीने पार पाडण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटींचे योगदान

विवाहसोहळ्यावरील खर्च वाचवून त्यातील 1 कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला आहे. या मदतीचा उपयोग संकटग्रस्त शेतकरी आणि गरजू कुटुंबांना दिलासा देण्यासाठी व्हावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

"सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणे ही केवळ जबाबदारी नसून आपले कर्तव्य आहे," असे मत अतुल सावे यांनी व्यक्त केले. त्यांच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >