Wednesday, November 4, 2026

US Midterm Election: मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष का पराभूत झाला? ही आहेत पाच कारणं

अमेरिकेत मध्यावधी निवडणुका पार पडल्या आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का बसला. डेमोक्रॅट्स पक्षाने हाउस आणि सिनेट या दोन्ही ठिकाणी सरशी घेतली. पण रिपब्लिकन पक्ष मध्यावधी निवडणुकीत पिछाडीवर का पडला? हा देखील प्रश्न आहे.

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. या निवडणुकीत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स हे पक्ष आमनेसामने आले होते. खरं तर या निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा रिपब्लिक पक्ष मजबूत स्थितीत होता. पण मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांना धक्का बसला आहे. कारण डेमोक्रॅट्स पक्षाने हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्ह आणि सिनेट या दोन्ही ठिकाणी सरशी घेतली आहे. त्यामुळे अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांवर डेमोक्रॅट्स पक्षाची पकड निर्माण झाली आहे. या पराभवानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कामगिरीचं स्पष्टीकरण दिलं आहे. इराण युद्ध आणि त्यामुळे झालेल्या महागाईचा या निवडणुकीवर परिणाम झाल्याचं त्यांनी मान्य केलं. पण हे नेतृत्वाविरोधात मत नसल्याचं देखील सांगण्यास विसरले नाहीत. ट्रम्प यांनी आपल्या पराभवाची पाच कारणं सांगतली. पेट्रोलच्या वाढलेल्या किमीत, निवडणुकीत स्वत:ची अनुपस्थिती, रिपब्लिकन उमेदरावांची कमकुवत बाजू, फॉक्स न्यूजने विरोधी पक्षावर अतिरिक्त भर आणि डेमोक्रॅटिक पक्षाची प्रचाराची आक्रमकता हे पाच मुद्दे यांनी पराभवासाठी कारणीभूत धरले.

या पाच चुका नडल्या

  • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य केले की, इराणबाबतच्या निर्णयाशी लोकं सहमत होते. पण त्यांना वाढलेल्या पेट्रोलच्या किमतीबाबत त्रास होता. इराणसोबतच्या युद्धामुळे इंधनाच्या किमती वाढल्या आहेत, हे त्यांनी मान्य केलं. याचा अमेरिकन नागरिकांच्या खिशावर परिणाम झाला.
  • नाव मतपत्रिकेवर नसल्याचा फटका बसला, असा दुसरा युक्तिवाद डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. जर स्वतः निवडणुकीत उभे राहिले असते, तर पक्षाने प्रचंड विजय मिळवला असता, असा दावा त्यांनी केला.
  • ट्रम्प यांनी पराभवासाठी आपल्या पक्षाच्या उमेदवारांनाही जबाबदार धरले. त्यांच्या मते, अनेक उमेदवारांना मतदारांचा पाठिंबा नव्हता, तसेच काहींना पक्षाच्या समर्थकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही.
  • रिपब्लिकन पक्षाच्या पराभवासाठी ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला जबाबदार धरलं. ट्रम्प म्हणाले की, फॉक्स न्यूजने आपल्या चॅनलवर सातत्याने डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षांना स्थान दिले.
  • मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅट्सनी आक्रमकपणे प्रचार केला आणि निवडणूक लढवली. त्याचा त्यांना फायदा झाल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं.

माझ्याकडे वीटो अधिकार....! ट्रम्प यांनी टाकले फासे

डेमोक्रॅट्सने मध्यवधी निवडणुकीत राजकीय समीकरण बदललं असलं तरी ट्रम्प मागे हटण्यास तयार नाहीत. गरज पडल्यास आपण आपल्या वीटो अधिकाराचा वापर करू, असे त्यांनी म्हटले आहे. "माझ्याकडे अंतिम अधिकार आहे, त्याला वीटो म्हणतात," असे ट्रम्प यांनी सांगितलं. अमेरिकन राजकारणात, राष्ट्रपतींचा नकाराधिकार हा काँग्रेसच्या निर्णयांवर नियंत्रण ठेवण्याचे एक महत्त्वाची घटनात्मक ताकद मानली जाते. जर काँग्रेसने एखादे विधेयक मंजूर केले, तर राष्ट्रपती त्याला नकाराधिकार वापरू शकतात.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >