0,0,0,0,0,W..! न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात रोहित शर्मा शून्य, वर्ल्डकपपूर्वीच्या कामगिरीला धक्का
भारत न्यूझीलंड यांच्यात पहिला वनडे सामन्यात रोहित शर्मा फेल गेला. त्याला आपलं खातंही खोलता आलेलं नाही. त्यामुळे वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्याच्या त्याच्या स्वप्नांना धक्का बसला आहे.
November 4, 2026 12:32 PM
0,0,0,0,0,W..! न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात रोहित शर्मा शून्य, वर्ल्डकपपूर्वीच्या कामगिरीला धक्का (Photo: ANI)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला वनडे सामना ऑकलँडच्या ईडन पार्कवर सुरू आहे. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताने न्यूझीलंडला 185 धावांवर रोखलं. भारताने 40.2 षटकात न्यूझीलंडचा संपूर्ण संघ तंबूत पाठवला. भारताकडून अर्शदीप सिंगने 4, गुरनूर ब्रारने 3 आणि अंशुल कंबोजने 2 विकेट काढल्या. त्यामुळे भारतासमोर सोपं आव्हान आलं. या धावांचा पाठलाग भारतीय संघ सहज करेल असं क्रीडाप्रेमींना माहिती होतं. पण न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना भारताला पहिल्याच षटकात धक्का बसला. सलामीला आलेला रोहित शर्मा काहीही करू शकला. स्ट्राईकला आला आणि सहा चेंडूंचा सामना करत विकेट देऊन गेला. काइल जेमिसनने त्याची विकेट काढली.
रोहित शर्मासोबत पहिल्या षटकात काय झालं?
रोहित शर्मा हा काईल जेमिसनच्या माऱ्याचा सामना करताना पहिल्या चेंडूपासून चाचपडताना दिसला. दुसऱ्या त्याची विकेट पडता पडता राहिली. त्यानंतर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर कसाबसा सावरलं. पण तयार झालेला दबाब दूर करताना चूक करून बसला. शेवटच्या चेंडूवर मिड ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू विकेट देऊन गेला. मिड ऑफला असलेल्या मिचेल सँटनरने झेल पकडण्यास कोणतीही चूक केली नाही. आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि जेमिसन यांच्यात सहा डावात आमनासामना झाला आहे. या जेमिसनने रोहित शर्माला एकूण 71 चेंडू टाकले. त्यात रोहित शर्माने 48 धावा केल्या. पण तीन वेळा विकेट दिली आहे.
Rohit Sharma Out !!!
Poor form continue for Rohit Sharma
Rohit Sharma 0(6) https://t.co/MbpHtzRIIe
— BackToLobby (@_backtolobby) November 4, 2026
मुंबई: न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्चमध्ये भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यात खेळला गेलेला दुसरा अनौपचारिक कसोटी सामना अनिर्णित राहिला. मात्र, या सामन्यात ...
रोहित शर्मासाठी ही वनडे मालिका खूपच महत्त्वाची आहे. कारण या वनडे मालिकेत रोहित शर्माने चांगली कामगिरी केली तर त्याचं वर्ल्डकप खेळण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे. अशा स्थितीत पहिल्याच सामन्यात त्याने चाहत्यांची निराशा केली. त्याला खातंही खोलता आलं नाही. जर अशीच स्थिती राहिली तर त्याची संघात निवड होणं कठीण होईल. त्यामुळे आता पुढच्या वनडे सामन्यात काय कामगिरी करतो? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.