IND vs NZ 1st ODI: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत रचला नवा इतिहास
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात विराट कोहलीने महाविक्रम रचला आहे. 13 व्या चेंडूवर 12वी धाव घेतली आणि एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. चला जाणून घेऊयात काय विक्रम रचला ते...
November 4, 2026 01:00 PM
1/5 ऑकलँडच्या ईडन पार्कवर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. विराट कोहलीने या सामन्यात 12 धाव घेतली आणि वनडे क्रिकेटमध्ये विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी अशी कामगिरी कोणत्याही फलंदाजाला करता आली नाही. (Photo: ANI)
2/5 वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणं हे आव्हानात्मक मानलं जातं. त्यामुळे या क्रमांकावर फलंदाजी करताना 13 हजार धावांचा पल्ला गाठणं मोठी गोष्ट आहे. आजवर अशी कामगिरी कोणत्याही फलंदाला करता आलेली नाही. त्यामुळे जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज आहे. (Photo: ANI)
3/5 रोहित शर्मा पहिल्याच षटकात बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजीला आला. त्याने या सामन्यात सावध फलंदाजी करण्यास सुरूवात केली. या सामन्यात 13व्या चेंडूचा सामना करताना 12वी धाव पूर्ण केली आणि 13 हजार धावांचा टप्पा गाठला. (Photo: ANI)
4/5 विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 13 हजार धावांचा पल्ला गाठणारा पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी इथपर्यंत कोणीही पोहोचू शकलेलं नाही. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावावर 12662 धावा आहे. इतकंच काय वनडे इतिहासात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 10 हजारपेक्षा जास्त धावा करणारे कोहली आणि पाँटिंग हे दोनच खेळाडू आहेत. (Photo: ANI)
5/5 विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर 61.55 च्या सरासरीने आणि 95.4 च्या स्ट्राईक रेटने हे स्थान मिळवले आहे. या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने 48 शतके आणि 69 अर्धशतके झळकावली आहेत. (Photo: ANI)