
Nashik Accident : नाशिकच्या राणेनगर परिसरात नायरा पेट्रोलियम कंपनीच्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. रघुनाथ एकनाथ भटाडे (वय ६०) असे मृताचे नाव असून, मंगळवारी (दि. ३) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. भरवस्तीत झालेल्या या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली.
नेमकं काय घडलं ?
राणेनगर येथील साई अपार्टमेंटमध्ये राहणारे रघुनाथ भटाडे हे पत्नीसमवेत दुचाकीवरून बाजारात जाण्यासाठी निघाले होते. यावेळी नायरा पेट्रोलियम कंपनीच्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे दोघेही रस्त्यावर कोसळले. त्याचवेळी टँकरचे चाक भटाडे यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पत्नी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
Nashik Crime : आरटीओ चलनाच्या नावाने मोबाईलवर पाठविण्यात आलेली एपीके फाईल उघडणे एका हॉटेल व्यावसायिकाला महागात पडले आहे. सायबर भामट्यांनी मोबाईलमध्ये ...
अपघातामुळे वाहतुकीची कोंडी
घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली.भरवस्तीत अवजड टँकरच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.





