
नवी दिल्ली: भारतीय सेनेमध्ये नोकरी करणाऱ्या तरूणांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने अग्निवीर योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने अग्निवीर योजनेमध्ये भरती होणाऱ्या अग्निवीरांचा 4 वर्षांचा कार्यकाळ वाढवून 6 वर्षे करण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. 2022 साली भारतीय सशस्त्र दलातील अग्निवीर योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आला. भारत सरकारने अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीच्या सेवेचा कालावधी दोन वर्षांनी वाढवला आहे. अग्निवीराच्या पहिल्या तुकडीचा चार वर्षांचा कार्यकाल येत्या 21 नोव्हेंबरला संपत आहे. त्याप्रमाणे अग्निवीरांना दोन वर्षांची मुदत वाढ देण्यात आली आहे. या दोन वर्षांच्या मुदतवाढीला सरकारने 'सेकंड टूर ऑफ ड्युटी' (Second Tour Of Duty) म्हटले आहे.
PM Modi and Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष व जेष्ठ नेते शरद पवार यांना रुबी रुग्णालयातून आज डिस्चार्ज देण्यात आला. दोन दिवस उपचार ...
सध्याच्या नियमांनुसार, चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर 25 टक्के अग्निवीरांना सैन्यात कायम ठेवण्याबाबतची अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. उर्वरित 75 टक्के अग्निवीरांना सेवेतून मुक्त केले जाते. नवीन प्रस्तावानुसार, या ७५ टक्के सेवानिवृत्त सैनिकांपैकी एका विशिष्ट गटाला आणखी दोन वर्षे सेवा करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. भारतीय सशस्त्र दलांमध्ये भरती झालेल्या अग्निवीरांच्या सेवानिवृत्तीसाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. भारतीय लष्करातील अग्निवीरांची पहिली तुकडी 31 डिसेंबर 2026 रोजी सेवानिवृत्त होईल. तर, भारतीय हवाई दलातील अग्निवीर 21 डिसेंबर रोजी आणि नौदलातील अग्निवीर 21 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होतील.
Bengaluru Gas Cylinder Fire: बंगळूरच्या मल्लेश्वरम परिसरात गॅस सिलिंडरची डिलिव्हरी सुरू असताना अचानक आग लागल्याची घटना घडली. घराच्या प्रवेशद्वाराजवळ लावलेल्या ...
मिळालेल्या माहितीनुसार, सरकार अग्निवीरांची सेवा कालावधी 4 वर्षांवरून 6 वर्षे करण्याच्या तयारीत आहे. मात्र, तिन्ही दलांमधील किती अग्निवीरांना ही मुदतवाढ मिळणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मूळ 25 टक्के कोटा कायम ठेवण्याव्यतिरिक्त ही मुदतवाढ देण्यात आल्याचं बोललं जात आहे. यामध्ये स्वतः अग्निवीरच ठरवतील की त्यांना सशस्त्र दलांमध्ये सेवा बजावायची आहे की ११.७१ लाख रुपयांच्या करमुक्त ‘सेवा निधी’ पॅकेजसह सेवा सोडायची आहे. जर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली, तर सशस्त्र दलांमध्ये ३ प्रकारचे कर्मचारी समाविष्ट केले जाऊ शकतात
- पहिली श्रेणी: ४ वर्षांची सुरुवातीची सेवा देणारे अग्निवीर
- दुसरी श्रेणी: सेवा विस्तार मिळालेले अग्निवीर
- तिसरी श्रेणी: नियमित कॅडरमध्ये समाविष्ट केलेले स्थायी सैनिक





