Thursday, November 5, 2026

IPL 2027: सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात डील, या चार खेळाडूंची आदलाबदल

आयपीएल 2027 स्पर्धेसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. पुढच्या महिन्यात लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. तत्पूर्वी फ्रेंचायझी आपल्या संघाला आवश्यक असलेल्या खेळाडूंसाठी ट्रेड करत आहेत. आता चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळाडूंची ट्रेड झाली आहे. चला जाणून घेऊयात...

आयपीएल 2027 स्पर्धेच्या लिलावापूर्वी रिटेन्शन डेडलाईन जवळ येत आहे. त्यामुळे फ्रेंचायझींमधील हालचाली वेगाने वाढल्या आहेत. आपल्या आवडत्या खेळाडूंच्या मागणीसाठी जोर लावला जात आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि अष्टपैलू हार्दिक पांड्यासाठी कोण बोली लावणार? याकडेही लक्ष लागून आहे. असं असताना दोन संघांनी चार खेळाडूंची आदलाबदल केली आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स या फ्रेंचायझींनी आपल्याला आवश्यक असलेल्या खेळाडूंची आदलाबदल केली आहे. यात लियाम लिव्हिंगस्टोन, खलील अहमद, नाथन एलिस आणि जॅक एडवर्ड्स या खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएलने गुरूवारी एक निवेदन जाहीर करत याबाबतची माहिती दिली आहे. यात सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्सने 2-2 खेळाडू बदलले आहेत.

कोणाचा फायदा? कोणाचं नुकसान?

सनरायझर्स हैदराबादने लियाम लिव्हिंगस्टोन आणि जॅक एडवर्ड्ससाठी चेन्नई सुपरकिंग्ससोबत ट्रेड केलं आहे. या बदल्यात चेन्नई सुपर किंग्सने खलील अहमद आणि नाथन एलिसला सनरायझर्स हैदराबादला दिलं आहे. या ट्रेडमध्ये फक्त खेळाडूंची अदलाबदल झाली आहे. यात कोणतीही रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळे या करारामुळे सर्वात जास्त नुकसान हे लियाम लिव्हिंगस्टोनचं झालं आहे. कारण इंग्लंडच्या आक्रमक अष्टपैलू खेळाडू असलेल्या लिव्हिंगस्टोनची सॅलरी निम्म्यावर आली आहे. कारण मागच्या लिलावात सनरायझर्स हैदराबादने 13 कोटी रुपये मोजून त्याला संघात घेतलं होतं. पण आता फ्रेंचायझीने त्याला फक्त 6 कोटी रूपयात ट्रेड केलं आहे. लिव्हिंगस्टोनने मागच्या पर्वात फक्त 2 सामने खेळले होते आणि 15 धावा केल्या होत्या. लियाम लिव्हिंगस्टोनला चेन्नई सुपर किंग्सकडून आता 6 कोटी रुपये मिळणार आहेत. म्हणजेच लिव्हिंगस्टोनचं 7 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू जॅक एडवर्ड्सने सनरायझर्स हैदराबादने मागच्या वर्षी 3 कोटींना खरेदी केली होती. याच रकमेत चेन्नई सुपर किंग्सने त्याला घेतलं आहे. तर चेन्नई सुपर किंग्सने खलीलला 4.8 कोटी घेतलं होतं. पण मागच्या दोन पर्वात त्याने निराशा केली होती. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सने त्याला ट्रेड केलं. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नाथन एलिसला चेन्नई सुपर किंग्सने 2 कोटींच्या बेस प्राईसवर ट्रेड केलं आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >