Thursday, November 5, 2026

सारा तेंडुलकर लवकरच अडकणार लग्नबंधनात? वहिनी सानियाने थेट होणाऱ्या नवऱ्याचा पत्ता सांगितला

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मुलीच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा होत असते. पण या अफवा असल्याचं अनेकदा सिद्ध झालं आहे. आता सारा तेंडुलकरच्या लग्नाचा विषय पुन्हा एकदा समोर आला आहे. तिच्या वहिनीने होणारा नवरा कुठे राहणारा असावा? हे सांगून टाकलं.

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर पडले की चाहत्यांचा लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू होतो. कारण सारा तेंडुलकरची फॅन फॉलोईंग खूप आहे. नुकताच सारा तेंडुलकरने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तिच्या लग्नाच्या बातमीने जोर धरला आहे. मागच्या महिन्यात 12 ऑक्टोबरला सारा तेंडुलकरचा वाढदिवस साजरा केला गेला. यावेळी घरीच बर्थडे केक आणून सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनचं चित्रिकरण केलं होतं. 25 दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर सारा तेंडुलकरने सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओत सारा तेंडुलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाा चांगला नवरा मिळो असा शुभेच्छा दिल्या. इतकंच काय तर सारा तेंडुलकरची वहिनी आणि अर्जुनची पत्नी सानिया चंडोकने तिला याच वर्षी चांगला जीवनसाथी मिळेल, असे आशीर्वाद दिले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने साराला शुभेच्छा देताना सांगितलं की, 'आशा करतो की तुला एक चांगला जीवनसाथी मिळेल. मी यापेक्षा जास्त काही बोलत नाही. तू अशीच सकारात्मकचा पसरवत राहा.' वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये वारंवार जीवनसाथीचा उल्लेख झाल्याने तिच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचा अंदाज नेटकरी बांधत आहेत. साराची आई अंजली तेंडुलकर म्हणाली की, 'तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत अशी मी प्रार्थना करते.' अर्जुन मिश्किलपणे म्हणाला की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा, बस्स एवढंच." त्याने दिलेल्या शुभेच्छा ऐकून सगळे हसले. सानियाच्या आईने साराला आशीर्वाद देत म्हटले, "तू दोन जुळ्या मुलांची मावशी हो."
 
View this post on Instagram
 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

सानिया चंडोक सारा तेंडुलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाली की, "मला आशा आहे की या वर्षी तुला पेरी क्रॉस रोडवर राहणारा जीवनसाथी मिळेल. म्हणजे तू नेहमी आमच्या जवळ राहू शकशील." सारा तेंडुलकर आता 29 वर्षांची असून तिच्या लग्नाच्या अनेकदा वावड्या उठल्या आहेत. आता तिचं लग्न खरंच ठरतं का? आणि तिचा जीवनसाथी कोण? याबाबत नेटकऱ्यांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा