
पाथर्डी (प्रतिनिधी) : जागतिक पातळीवर सर्व क्षेत्रांमध्ये बदलाचा वेग सध्या खूप वाढला आहे. जग झपाट्याने बदलत असून ज्ञान व माहितीची प्रत्येकाची भूक वाढली आहे. भारतीय तरुणांना सध्या परदेशी नोकरीचे आकर्षण आहे. भविष्यात अशी वेळ येईल की, जगातील गरजूंना भारतीय नोकऱ्यांचे वेड लागेल, असे मत श्रीतीलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतीश गुगळे यांनी व्यक्त केले.
शैक्षणिक व सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांतर्गत विविध देशातील विद्यार्थी गेल्या सात वर्षांपासून श्री तिलोक जैन विद्यालयात अभ्यास दौऱ्यासाठी येतात. या वर्षी मेक्सिको येथील विद्यापीठाचे तीन विद्यार्थी, दोन विद्यार्थिनी, व एक शिक्षिका असे सहा जणांची शिष्टमंडळ दाखल झाले आहे. या विद्यार्थ्यांचा शानदार स्वागत सोहळा विद्यालयाच्या पटांगणावर झाला. यावेळी मेक्सिकोचे विद्यार्थी रेनाटा व ॲलन यांचे अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत झाल्याने त्यांच्यासह स्थानिक विद्यार्थी सुद्धा भारावून गेले.
ब्लिंकिट ॲम्ब्युलन्स (Blinkit Ambulance) या मोफत ॲम्ब्युलन्स सेवा पुरवणाऱ्या उपक्रमाने आपल्या धोरणात महत्त्वाचा बदल केला आहे. गंभीर किंवा आणीबाणीच्या ...
प्राचार्य अजय भंडारी, उपप्राचार्य भारत गाडेकर, पर्यवेक्षक बाळासाहेब गांगुर्डे, सुधाकर सातपुते, इंग्लिश स्कूलचे प्राचार्य विजय तागड, संस्थेचे पदाधिकारी डॉ. ललित गुगळे, सुरेश कुचेरिया, राजेंद्र मुथा, प्रीतम बाबर, सुरज बाबर आदि प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
जैन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मेक्सिको विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांबरोबर रसायनशास्त्र व पर्यावरण संबंधीच्या विषयावर अभ्यास करत संयुक्त प्रकल्प तयार केले. येथे या प्रकल्पांचे सादरीकरण सुद्धा होणार आहे. एकूण पाच दिवसांचा शैक्षणिक दौरा असून यादरम्यान त्यांचे प्रमुख देवस्थानांना भेट, ऐतिहासिक व नैसर्गिक क्षेत्रांचा अभ्यास, कुटुंब व्यवस्थेचा अभ्यास, दैनंदिन आहार व जीवनशैलीचे सुद्धा अवलोकन मेक्सिकोच्या विद्यार्थ्यांकडून होणार आहे.
यावेळी बोलताना डॉ. ललित गुगळे म्हणाले, "भारताचे आठ हजार नागरिक मेक्सिकोमध्ये उद्योग व्यवसायात कार्यरत आहेत. मिरची, बटाटे, गहू या पदार्थांची भारताला याच देशाकडून देणगी मिळून तीच परंपरा पुढे चालली. आज आपल्याला ही पिके भारतीय वाटतात, पण याचे मूळ मेक्सिकन आहे. अन्न संस्कृती सुद्धा बऱ्याच अंशी भारतासारखीच आहे. दोन्ही देशांमधील विद्यार्थी संशोधन अभ्यास व नाविन्याचा शोध संयुक्तपणे घेत काही नवीन मुद्दे शोधत आहेत. सांस्कृतिक, शैक्षणिक व भावनिक जवळीक दोन्ही देशांसाठी प्रगतीची नवी दालने खुली करू शकते. भारतीय विद्यार्थ्यांकडून वैश्विक स्तरावर देशाची प्रतिमा व बुद्ध्यांक उंचावण्यासाठी जागतिक पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांना असे कार्यक्रम पूरक ठरतात."
प्रास्ताविक मुख्य समन्वयक प्रा. डॉ. श्रीकांत काळोखे, सूत्रसंचालन सुनील कटारिया, वेदिका देवढे व अक्षया गुंजाळ यांनी केले. अनिल पानखडे यांनी आभार मानले.
मुख्य स्वागत समारंभ नंतर विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमाला सुद्धा प्रमुख पाहुण्यांसह विद्यार्थी व मान्यवरांनी भरभरून प्रतिसाद दिला






