Friday, November 6, 2026

Vaishnavi Hagawane Case Update: वैष्णवी हगवणे प्रकरणात उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ३ जणांना जामीन मंजूर

मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील 3 जणांना जामीन मंजूर केला आहे. पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक हागवणे, सासू लता हागवणे, नणंद करिश्मा हागवणे, सासरे राजेंद्र हागवणे, दीर सुशील हागवणे आणि कुटुंबीय मित्र निलेश चव्हाण यांना अटक केली होती.

Vaishnavi Hagawane Case Update: पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले होते. या प्रकारांत आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. सध्या पायल झांबरे मृत्यू प्रकरण चर्चेत असताना आता वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील 3 जणांना जामीन मंजूर केला आहे. पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक हागवणे, सासू लता हागवणे, नणंद करिश्मा हागवणे, सासरे राजेंद्र हागवणे, दीर सुशील हागवणे आणि कुटुंबीय मित्र निलेश चव्हाण यांना अटक केली होती. अशातच यातील तीन आरोपींना आता जामीन मंजूर करण्यात आला आहे.

या प्रकरणातील सासू लता हगवणे, सुशील हगवणे आणि निलेश हगवणे या तिघांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर करून प्रत्येकी 25 हजार रूपये वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, जामीन मंजूर करताना काही अति देखील घालण्यात आल्या आहेत. (Vaishnavi Hagawane Dowry Case)

या अटींनुसार, 1. तिन्ही आरोपींना साक्षीदारांवर कोणताही प्रभाव टाकता येणार नाही. 2. पुढील सहा महिने दर महिन्याच्या पहिल्या रविवारी बावधन पोलीस ठाण्यात हजेरी लावणं बंधनकारक असणार आहे. 3. या प्रकरणांतील पुराव्यामध्ये कोणताही हस्तक्षेप करता येणार नाही.

जामीन मिळणे म्हणजे निर्दोष मुक्तता नाही दरम्यान, कोर्टात सुनावणी वेळी जामीन आदेशाला तीन आठवड्यांची स्थगिती देण्यात यावी अशी तक्रारदारांनी मागणी केली होती. ती न्यायालयाने फेटाळून लावली. जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, हे कोर्टाने निकाल देताना स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात कोणकोणती माहिती समोर येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर वैष्णवीचा पती शशांक हागवणे, नणंद करिश्मा हागवणे आणि सासरे राजेंद्र हागवणे यांची रवानगी जेलमध्येच असणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >