Nashik : सप्तशृंगी गडावर दुर्दैवी घटना ! शितकड्यावरून उडी घेत 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं

कळवण : नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध सप्तशृंगी गडावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. कळवण तालुक्यातील जामशेद येथील २४ वर्षीय राहुल भाऊराव साबळे याने शितकड्यावरून उडी मारत आत्महत्या केली आहे. ६ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे जामशेद गावासह अभोणा परिसरात शोककळा पसरली आहे.



घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल


मिळालेल्या माहितीनुसार, सप्तशृंगी गडावरील शिवालय तलावाजवळ असलेल्या शितकड्यावर ही घटना घडली. राहुल साबळे याने उडी घेण्यापूर्वी स्वतःचा व्हिडिओ चित्रित केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती गडावरील संदीप बेनके यांनी नांदुरी पोलिसांना दिली. त्यानंतर नांदुरी पोलिसांनी कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.



सकाळी शोधमोहीमेत मृतदेह आढळला


अंधारामुळे बचाव आणि शोधकार्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे ६ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता पुन्हा परिसराची पाहणी करण्यात आली. यावेळी शितकड्याच्या खालील सपाट भागात, वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भातोडा शिवारात राहुलचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.



दिवाळीच्या सणात जामशेद गावावर शोककळा


राहुल साबळे याचा अभोणा येथे रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय होता. तो स्वभावाने हसतमुख आणि आनंदी असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. दिवाळीच्या सणाच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून जामशेद गावासह अभोणा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. राहुलने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

Comments
Add Comment

Amit shah uttarakhand visit : उत्तराखंडला अमित शाहांची १५०८ कोटींची 'दिवाळी भेट'; राहुल बाबाच्या 'व्होट बचाओ यात्रे'वर कडाडून टीका

देहरादून : उत्तराखंड स्थापना दिनानिमित्त आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी

IND vs NZ 2nd ODI: वेलिंग्टनमध्ये विराट कोहलीच्या रडारवर सचिन आणि पॉन्टिंगचे विक्रम, काय ते जाणून घ्या

[caption id="attachment_1072895" align="aligncenter" width="800"] विराट कोहलीची रनमशिन म्हणून ख्याती आहे. पण टी20 आणि कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती

Ahilyanagar Diwali News: वंचितांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवून उजळले संस्कारांचे दीप; जेएसएस गुरुकुलचा उपक्रम

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई, फटाक्यांचा आनंद आणि नवीन कपड्यांची खरेदी नव्हे, तर

दलाल स्ट्रीटवर खळबळ! सेन्सेक्स तब्बल 1,718 अंकांनी झेपावला, निफ्टीनेही ओलांडला 25,000 चा टप्पा!

मुंबई: भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी दिवाळीच्या तोंडावर अभूतपूर्व आणि तुफान तेजी पाहायला मिळाली. खरेदीचा

Nashik : नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई ! 258 किलो मोतीचूर लाडूंचा साठा जप्त

नाशिक : सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध

मराठवाड्यातील पाणीटंचाईवर मोठा निर्णय! ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ प्रकल्पाला गती, जायकाकडून 20 हजार कोटींच्या निधीचा सकारात्मक प्रतिसाद

मुंबई: मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढून हा भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने