Video: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीचा संताप, फॅन्सच्या त्या कृतीमुळे झाला नाराज
भारत न्यूझीलंड दुसऱ्या वनडे सामन्यात फॅन्सच्या एका कृतीने विराट कोहली संतापला. त्याची नाराजी चेहऱ्यावर स्पष्ट दिसलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
November 7, 2026 03:18 PM
Video: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीचा संताप, फॅन्सच्या त्या कृतीमुळे झाला नाराज (Photo: ANI)
क्रिकेट मैदानात सामना सुरू असताना फॅन्स लक्ष वेधून घेण्यासाठी पोस्टर, विचित्र हावभाव वगैरे करत असतात. क्रिकेट सामन्यात या गोष्टी होत असतात. पण भारत आणि न्यूझीलंड दुसऱ्या वनडे सामन्यातील एका विचित्र घटनेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. फॅन्सच्या एका कृतीमुळे रनमशिन विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली. त्याला कारणही तसंच आहे. भारताने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहली क्षेत्ररक्षण करण्यासाठी सीमारेषेजवळ उभा होता. त्याला सीमेरेषेजवळ उभं असल्याचं पाहून त्याच्या चाहत्याने संधी हेरण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी चूक करून बसला. स्वाक्षरी घेण्यासाठी चाहत्याने छोटी बॅट त्याच्या दिशेने फेकली. त्याची ही कृती पाहून विराट कोहलीचा संताप झाला. त्याने इशाऱ्याने चाहत्याला समज दिली आणि अशी कृती पुन्हा करू नको असं सांगितलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनुसार, भारत न्यूझीलंड सामना सुरू आहे. या सामन्यात विराट कोहली क्षेत्ररक्षण करण्यासाठी सीमेरेषेजवळ जात होता. तेव्हा त्याच्या जवळ एका चाहत्याने छोटी बॅट फेकली. त्यावर स्वाक्षरी हवी असल्याने त्याने तशी कृती केली होती. त्या बॅटकडे विराट कोहलीची नजर केली आणि त्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याने ती बॅट उचलली आणि मैदानाच्या बाहेर फेकली. यावेळी राखीव खेळाडू असलेला मोहम्मद सिराज तेथून धावत गेला आणि त्या चाहत्याकडे पाहिले. विराट कोहलीचा संताप पाहता त्याने स्वाक्षरी दिली नसावी, असं लोकं प्रतिक्रिया देत सांगत आहेत.
ANGRY VIRAT KOHLI ON KIDS! 😡
Virat Kohli warned a few kids who were throwing bats onto the field to get his autograph during the ongoing match. https://t.co/Zp7g3tmevo
— Mukku (@Cric_Mukku) November 7, 2026
[caption id="attachment_1073169" align="aligncenter" width="800"] दुसऱ्या वनडे सामन्यात शुभमन गिल फेल गेला. या सामन्यात न्यूझीलंडने विजयासाठी 135 धावा दिल्या होत्या. त्यामुळे सोपं आव्हान असं ...
विराट कोहलीचे जगभरात चाहते आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करण्यास तयार असतात. चाहते त्याच्यासोबत फोटो किंवा त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी प्रयत्नशील असतात. पण मैदानात बॅट फेकून स्वाक्षरी घेणं हे काही विराट कोहलीला आवडलं नाही. दुसरीकडे, या सामन्यात विराट कोहलीची बॅट हवी तशी चालली नाही. विराट कोहलीने या सामन्यात 7 चेंडूंचा सामना केला आणि 7 धावा करून बाद झाला. जेकब डफीच्या गोलंदाजीवर विल यंगने त्याचा झेल पकडून तंबूचा रस्ता दाखवला.