Saturday, November 7, 2026

How to Remove Sticker Rangoli: जमिनीवर चिकटलेली रांगोळी काढण्याची सोपी पद्धत तुम्हाला माहित आहे का?

विशेषतः ज्यांना रांगोळी काढता येत नाही किंवा ज्यांच्याकडे त्यासाठी वेळ नसतो, असे सगळेजण स्टिकर रांगोळीला पसंती देतात. पण या स्टिकर रांगोळ्या कधीकधी वर्षभर तशाच चिकटून राहतात, पण दिवाळी जवळ आल्यावर त्या काढायला कठीण होत. चिकट पदार्थ तसाच राहिल्यामुळे रांगोळी काढणे कठीण होते.

How to Remove Sticker Rangoli: दिवाळीच्या दिवसांत सगळेजण घरच्या अंगणात किंवा दारात रांगोळी काढतात. पण कामाच्या व्यापामुळे 1-2  तास रांगोळी काढायला अनेकांना वेळ मिळत नाही. त्यामुळे ते स्टिकर रांगोळी काढण्याचा मार्ग स्वीकारतात. तसेच घराच्या सजावटीसाठी स्टिकर रांगोळीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. विशेषतः ज्यांना रांगोळी काढता येत नाही किंवा ज्यांच्याकडे त्यासाठी वेळ नसतो, असे सगळेजण स्टिकर रांगोळीला पसंती देतात. पण या स्टिकर रांगोळ्या कधीकधी वर्षभर तशाच चिकटून राहतात, पण दिवाळी जवळ आल्यावर त्या काढायला कठीण होत. चिकट पदार्थ तसाच राहिल्यामुळे रांगोळी काढणे कठीण होते. जर तुम्ही यावर्षी नवीन रांगोळी काढण्याचा विचार करत असाल आणि जुनी रांगोळी काढू इच्छित असाल, तर त्याचे सोपे उपाय आज तुम्हाला समजणार आहेत. यामुळे जमिनीचे कोणतेही नुकसान होणार नाही.
1 . रांगोळी चिकटलेल्या जागेवर थोडे कोमट पाणी टाका. त्यावर भांडी घासण्याचे लिक्विड जेल किंवा विम लिक्विडचे काही थेंब टाका. 5 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर जुन्या टूथब्रशने किंवा स्क्रबरने हलक्या हाताने घासून घ्या. 2 . जर रांगोळी प्लास्टिकची किंवा जाड स्टिकर्सची बनलेली असेल, तर सगळ्यात आधी त्याची कडा किंचित उचला. कलर करताना वापरला जाणारा पुट्टी नाइफ किंवा इस्त्रीचा कागद हा सर्वोत्तम पर्याय आहे. एका हातात स्टिकर धरा आणि दुसऱ्या हाताने पुट्टी नाइफ वापरून हळूवारपणे वरच्या दिशेने ढकला. असे केल्याने स्टिकर सहजपणे निघून येईल. 3. व्हाईट व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात घेऊन एकत्र करा. हे मिश्रण रांगोळीवर स्प्रे करा किंवा टाका. 10 मिनिटे तसेच राहू द्या, यामुळे रांगोळीची पकड सैल होते आणि स्टिकर निघण्यास मदत होईल.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >