Saturday, November 7, 2026

Thane News: दिवाळी पहाटनिमित्त ठाणे शहरामध्ये 'या' प्रमुख मार्गांवर प्रवेश बंदी, पर्यायी मार्ग कोणते?

दिवाळी पहाट कार्यक्रमानिमित्त ठाणे शहरातील प्रमुख रस्त्यांवर प्रवेश बंदी करण्यात आली आहे. कोणकोणत्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी आहे, जाणून घ्या एका क्लिकवर...

ठाणे: ठाणेकरांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये आणि ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर दिवाळी सणाचा जल्लोष पाहायला मिळतो. दिवाळीच्या दिवशी अर्थात लक्ष्मीपूजनच्या दिवशी अनेक ठिकाणी दिवाळी पहाटचा कार्यक्रम पाहायला मिळतो. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमानिमित्त ठाणे शहरातील काही रस्त्यांवर प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ठाणे शहरामध्ये दिवाळी पहाटच्या कार्यक्रमानिमित्त, प्रवेश बंदी करण्यात आल्यामुळे ठाणेकरांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यासाठी सल्ला देण्यात आला आहे. कोणकोणत्या मार्गांवर प्रवेश बंदी आहे आणि कोणकोणते पर्यायी मार्ग आहेत, जाणून घेऊया...

लक्ष्मीपूजनच्या दिवशी, वागळे वाहतूक उपविभागाच्या हद्दीत सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत, ठाणे पश्चिमेतील, उपवन तलाव आणि वर्तक नगर परिसरामध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम आहे. या कार्यकमानिमित्त मोठ्या प्रमाणावर तरुण- तरुणी उपस्थित राहतात. अगदी लहानांपासून थोऱ्यामोठ्यांपर्यंत नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात. इतकंच नाही तर, कार्यक्रम स्थळ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के उपस्थित राहणार आहेत. शिवाय, दिवाळी पहाटच्या कार्यक्रमानिमित्त सेलिब्रिटी सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे, पायलादेवी मंदिर कडून येउर गेटकडे येणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करून पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, रिसरातील वाहतूक सुरळीत आणि सुनिश्चित राहणे सामान्य नागरिकांच्या सोईसाठी आवश्यक आहे.

 

बिरसामुंडा चौक, गावड बाग परिसरातील सर्व वाहनांना पायलादेवी मंदिराकडून येऊर कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पायलादेवी मंदिर चौक येथे 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. सर्व प्रकारची वाहनांना येऊर कडून पायलादेवी मंदिरकडे येणाऱ्या दोन रोड पैकी एका लेनचा वापर करुन इच्छीत स्थळी जाता येईल. वाहतूकीचे नियम लक्ष्मीपूजनच्या दिवशी अर्थात दिवाळीच्या दिवशी सकाळी 5 ते सकाळी 10 वाजेपर्यंत वाहतूक दारांना पाळावे लागणार आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी दिलेले वाहतूकीचे नियम पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सिजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >