
Kanpur Hit & Run Case: उत्तर प्रदेश येथील कानपूरमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या एका थार कारने स्कूटर चालवणाऱ्या एका तरुणाला धडक दिली. दिवाळीच्या पूर्वसंध्येला शनिवारी रात्री ही घटना घडली असून, थार कारमधील दोन तरुणींनी गाडी सोडून पळ काढला आहे. अपघात इतका भीषण होता की, स्कूटर चालवणारा तरुण रस्त्यावरून फेकला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हा अपघात कल्याणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आवास विकास चौकीजवळ घडला असून यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे, थार कारवर 'कृष्णा ग्रुप' लिहिले आहे. गाडी चालवताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने थार गाडीने रस्त्यावरील अनेक लोकांना धडक दिली आणि त्यानंतर स्कूटरस्वार संतोष सिंग चौहान यांना धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ठाणे : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजा संकटाचा सामना करत असताना, महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना या कठीण काळातून बाहेर काढण्यासाठी पूर्ण ...
पोलीस तपास यासंदर्भात, मृताच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला आला असून गुन्हा दाखल केला जात आहे. त्यामुळे याबदल पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, मृताची ओळख पांकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी संतोष कुमार सिंग अशी पटली असून थारच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे, पोलिसांनी वाहन मालक आणि फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे. यासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले जात आहे. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अपघातात सामील असलेल्या थार गाडीची ओळख पटली आहे. शिवाय, अपघाताला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचा तपास सुरू आहे.
View this post on Instagram
समोर आलेल्या माहितीनुसार, एसयूव्ही भरधाव वेगात होती आणि स्कूटरला धडक दिल्यानंतर ती सुमारे 25 ते 30 मीटरपर्यंत फरफटत नेली आणि अखेरीस एका रेलिंगवर जाऊन आदळली. त्यामुळे पोलीस आता या प्रकरणाच्या सर्व पैलूंची तपासणी करत असून, वाहनातून प्रवास करणाऱ्या महिलांची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्याचे काम करत आहेत.






