Sunday, November 8, 2026

Mumbai Fire : मुंबई आणखी एक भीषण घटना; अंधेरीतील हंस वल्लभ इमारतीच्या ७ व्या मजल्यावरील घराला आग

या घटनेत धुरामुळे त्रास झालेल्या 64 वर्षीय व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Mumbai Fire News: अंधेरी पश्चिम येथील राम मंदिर रोडवरील हंस वल्लभ इमारतीच्या 7 व्या मजल्यावरील एका घराला आग लागल्याची घटना 9 नोव्हेंबर रोजी घडली. या आगीत घरातील इलेक्ट्रिक वायरिंग, फर्निचर, एसी आणि इतर साहित्याचे नुकसान झाले. या घटनेत धुरामुळे त्रास झालेल्या 64 वर्षीय व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

घरातील इलेक्ट्रिक वायरिंग आणि फर्निचरचे नुकसान

मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला सकाळी 9:05 वाजता आगीची माहिती मिळाली. हंस वल्लभ ही स्टिल्ट अधिक 8 मजली इमारत असून, तिच्या 7 व्या मजल्यावरील 701 क्रमांकाच्या घरात आग लागली होती.

प्राथमिक माहितीनुसार, आग घरातील इलेक्ट्रिक वायरिंग आणि विद्युत उपकरणांपुरती तसेच बेड, स्प्लिट एसी, लाकडी फर्निचर, घरगुती वस्तू आणि कागदपत्रांपर्यंत मर्यादित होती. सुमारे 500 ते 800 चौरस फूट परिसरातील साहित्याचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवून ती विझवली.

धुरामुळे 64 वर्षीय व्यक्तीला त्रास

या घटनेत महेश मिस्त्री (वय 64) यांना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झाला. त्यांना विलेपार्ले पूर्व येथील बाबासाहेब गावडे चॅरिटेबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना अतिदक्षता विभागात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेत घरातील साहित्याचे नुकसान झाले असून, पुढील तपशीलाची प्रतीक्षा आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >