Dharashiv Fire Incident News: धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री घराला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण घर खाक होऊन सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर एक जण बचावला आहे. मध्यरात्री अचानक घराने पेट घेतला.
यातील धक्कादायक बाब म्हणजे, अग्निशामक दल वेळेत न आल्याने आग आटोक्यात आणणं शक्य झालं नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने भिंती फोडून धूर बाजूला करण्याचा प्रयत्न केला. तसेच काहींनी हातोड्याने भिंती फोडल्या. सुरुवातीला आतून वाचवण्यासाठी आवाज येत होता. मात्र त्यानंतर आवाज अचानक बंद झाला आणि त्यात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अस भयावह प्रसंग तेथील स्थानिक गावकऱ्यांनी सांगितला.
Thane News: दिवाळीच्या रात्री ठाण्यातील रहेजा गार्डन परिसरातील रहेजा कार्लाइन या 17 मजली इमारतीला भीषण आग लागली. इमारतीच्या 8 व्या मजल्यावरील एका घरात ...
किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर हे कुटुंब राहत असून मध्यरात्री अचानक घराला आग लागली. त्यामुळे घरातील सदस्यांना बाहेर पडता आले नाही. आगीत धुरामुळे गुदमरून सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच गावकरी, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, धाराशिवच्या शासकीय रुग्णालयात चार जणांना मृतावस्थेत दाखल करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दिवाळीनिमित्त घरात लावलेल्या पणत्यांमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. तरी आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे येडशी गावावर शोककळा पसरली आहे. दिवाळीसारख्या आनंदाच्या, मांगल्याच्या आणि प्रकाशाच्या सणात एका कुटुंबावर काळाने असा घाला घालावा, ही बाब अतिशय वेदनादायी आहे. ज्या घरात सणाचा आनंद आणि उत्साह असायला हवा होता, त्या घरात आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
https://www.instagram.com/reel/DfgsNplDYqk/?utm_source=ig_web_copy_link&psln=MzRlODBiNWFlZA==&srtk=MzRlODBiNWFlZA==
पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी व्यक्त केला शोक
या दुःखद प्रसंगात कारंडे कुटुंबीयांच्या दुःखात मी मनापासून सहभागी आहे, अशा शब्दांत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या तीव्र शोकभावना व्यक्त केल्या आहेत. तसेच या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व सहा जणांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांप्रती सरनाईक यांनी मनःपूर्वक संवेदना व्यक्त केल्या. कोणत्याही कुटुंबासाठी आपल्या प्रियजनांना अशा प्रकारे गमावणे ही कधीही भरून न निघणारी हानी आहे. या कुटुंबावर ओढवलेल्या दुःखाची तीव्रता शब्दांत व्यक्त करणेही कठीण आहे. या कठीण प्रसंगी शासन आणि जिल्हा प्रशासन पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असे त्यांनी सांगितले.