मुंबई- पुणे प्रवास सुसाट! जुना Mumbai-Pune Highway होणार सहापदरी, काय आहे MSRDC चा प्लॅन?

मुंबई- पुणे प्रवास काही केल्या ट्राफिकमुक्त होण्याचं नावच घेत नाहीये. द्रुतगती महामार्ग आणि मिसिंग लिंक हे दोन पर्याय उपलब्ध असतानाही वाहतूक कोंडी कमी होत नाहीये. असं असताना आता अशातच MSRDC ने मुंबई- पुणे हायवे सहा पदरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई: मुंबई- पुणे या दोन शहराला जोडणाऱ्या मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई- पुणे महामार्ग असे दोन पर्याय आहेत. पण असं असतानाही पुण्याला जाताना मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो. मुंबईकरांची आणि पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी गेल्या वर्षी मिसिंग लिंकचा सुद्धा पर्याय आहे. असं असतानाही काही केल्या वाहतूक कोंडी फुटण्याचं नाव घेत नाहीये. मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग सहापदरी असताना, आता यानंतर मुंबई- पुणे महामार्ग सुद्धा सहापदरी बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता, MSRDC ने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.



मुंबई- पुण्यातील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता, MSRDC ने प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित करण्यासाठी सहापदरी रस्ता बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी सल्लागार नेमण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. 150 ते 156 किमी लांबीचा मुंबई- पुणे महामार्ग सध्याच्या घडीला चौपदरी आहे. सध्याच्या घडीला या महामार्गावरून दिवसाला 70 हजार वाहनांची ये- जा होते. सणासुदीच्या काळामध्ये त्याहून अधिक वाहनांची वरदळ या रस्त्यावर पाहायला मिळते. असं असताना, भविष्यात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता सरकारने ह्या महामार्गाचे सहापदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई- पुणे महामार्गाचे सहापदरीकरण झाल्यानंतर प्रवाशांचा प्रवास अधिक जलद होईल.



मिळालेल्या माहितीनुसार, निगडी ते शिळफाटा दरम्यानच्या 111 किमीच्या रस्त्याचं सहा पदरीकरण केलं जाणार आहे. या कामासाठी अद्याप खर्च समोर आलेला नाही, पण सविस्तर प्रकल्प आराखडा तयार झाल्यानंतरच खर्च समोर येईल. प्राथमिक अंदाजानुसार, या प्रकल्पासाठी 5 ते 6 हजार कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, मुंबई- पुणे महामार्गाचे सहापदरीकरणाचा खर्च वसूल करण्यासाठी MSRDC ने पथकर वसुलीच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या महामार्गावर 2035 पर्यंत पथकर वसुली करण्यास मुभा आहे. मात्र, या प्रकल्पामुळे हा टोल वसुलीचा कालावधी आणखी 10 ते 15 वर्षांनी वाढवला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

मुंबईत पहिल्या रोपवेचा मार्ग मोकळा; मुलुंडच्या रोपवेसाठी सल्लागार नियुक्तीची साबां विभागाने काढली निविदा

मुंबईतील पहिल्या रोपवे प्रकल्पाच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुलुंडच्या

बोरिवली-कांदिवलीकरांचा प्रवास होणार आरामदायी! BEST ची नवी वातानुकूलित बससेवा सुरू

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाने सोमवारी (09 नोव्हेंबर) बोरिवली रेल्वे स्टेशन पासून एक नवीन

Prabhadevi Station Bridge: प्रभादेवी स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गुड न्यूज; फलाटावर ये-जा करण्यासाठी पूल खुला

मुंबई : प्रभादेवी स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. सकाळी ऐन गर्दीच्या वेळी फलाटावर जा-ये

Mumbai Fire : मुंबई आणखी एक भीषण घटना; अंधेरीतील हंस वल्लभ इमारतीच्या 7 व्या मजल्यावरील घराला आग

Mumbai Fire News: अंधेरी पश्चिम येथील राम मंदिर रोडवरील हंस वल्लभ इमारतीच्या 7 व्या मजल्यावरील एका घराला आग लागल्याची घटना 9

Dongri Fire: डोंगरीतील नूर बाग परिसरात मध्यरात्री भीषण आग, दुकाने आणि काही झोपड्यांचे मोठे नुकसान

मुंबई : मुंबईत 8 नोव्हेंबरच्या रात्री डोंगरी आणि अंधेरी पूर्व परिसरात गॅरेजला आग लागल्याच्या दोन घटना घडल्या. या

GMLR प्रकल्पांतर्गत 'विहार' टनेल बोरिंग मशीनद्वारे दुसऱ्या भूमिगत बोगद्याचे खोदकाम सुरू, संपूर्ण प्रोजेक्टची वाचा अपडेट

मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्पाच्या टप्पा 3 (ब) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) जमिनीखालून