
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये चित्रपटप्रेमींसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी पाहायला मिळत आहे. एकीकडे बॉलिवूडचा बहुचर्चित 'रामायण' चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे, तर दुसरीकडे दाक्षिणात्य चित्रपटही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. रविवार, 8 नोव्हेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर 'रामायण', 'सीन', 'जेलर 2' आणि 'मूकुथी अम्मन 2' या चित्रपटांच्या कमाईची चर्चा रंगली. विशेष म्हणजे रणबीर कपूरच्या 'रामायण'ने भारतात 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर सूर्या यांच्या 'सीन' चित्रपटानेही पहिल्या वीकेंडमध्ये चांगली कमाई केली आहे.(Ramayana Box Office Collection0
1. 'रामायण'ने बॉक्स ऑफिसवर गाजवले मैदान
दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा बहुप्रतीक्षित 'रामायण' चित्रपट 5 नोव्हेंबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीराम यांच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसत आहेत. याशिवाय चित्रपटात अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. चित्रपटाच्या भव्य निर्मितीमुळे आणि कलाकारांच्या भूमिकांमुळे प्रदर्शनापूर्वीपासूनच त्याची चर्चा होती. प्रदर्शनानंतरही प्रेक्षकांकडून चित्रपटाला प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवरील आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात 64.85 कोटी रुपयांची नेट कमाई केली. दुसऱ्या दिवशी 48.05 कोटी रुपये, तर तिसऱ्या दिवशी 69.80 कोटी रुपयांची कमाई केली. रविवारी चौथ्या दिवशी चित्रपटाने 56.15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यामुळे भारतातील चार दिवसांचे एकूण नेट कलेक्शन 238.85 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर जगभरातील ग्रॉस कलेक्शन 499.20 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे वृत्त आहे.(Ramayana Sunday Box Office Report)
Mumbai News: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग जोडमार्ग प्रकल्पाचे 67 टक्के भौतिक काम पूर्ण झाले ...
2. सूर्या यांच्या 'सीन'चीही बॉक्स ऑफिसवर जादू
दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्या यांच्या 'सीन' चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. जितू माधवन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा क्राइम-कॉमेडी प्रकारातील चित्रपट असून, त्यामध्ये वेगळ्या धाटणीची कथा पाहायला मिळते. चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांतच जगभरात 80 कोटी रुपयांहून अधिक कमाई केल्याचे वृत्त आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने भारतात 19.15 कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी हा आकडा वाढून 20.25 कोटी रुपयांवर पोहोचला. रविवारी तिसऱ्या दिवशीही चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली. उपलब्ध सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, तिसऱ्या दिवशी भारतात चित्रपटाने सुमारे 23.16 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले. त्यामुळे पहिल्या वीकेंडमध्ये चित्रपटाने चांगली कामगिरी केली आहे.(The Scene Box Office Collection)
3. रजनीकांत यांच्या 'जेलर 2'ची कमाई किती?
सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'जेलर 2' चित्रपटाचीही बॉक्स ऑफिसवरील घोडदौड सुरू आहे. नेल्सन दिलीपकुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या ॲक्शन-ड्रामा चित्रपटात रजनीकांत पुन्हा एकदा टायगर मुथुवेल पांडियन या भूमिकेत दिसत आहेत. चित्रपटात राम्या कृष्णन, मोहनलाल, शिवराजकुमार, विजय सेतुपती आणि विद्या बालन यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. 15 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. सुरुवातीच्या काळात चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता प्रदर्शनाच्या 25व्या दिवशीही चित्रपटाची कमाई सुरू आहे. 8 नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाचे भारतातील एकूण नेट कलेक्शन अंदाजे 470.40 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर जगभरातील ग्रॉस कलेक्शन सुमारे 827 कोटी रुपये झाल्याचे वृत्त आहे.(Jailer 2 Worldwide Box Office)
4. 'मूकुथी अम्मन 2'लाही प्रेक्षकांचा प्रतिसाद
नयनतारा यांच्या 'मूकुथी अम्मन 2' या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर आपली छाप पाडण्यास सुरुवात केली आहे. हा तमिळ-तेलुगू फँटसी-कॉमेडी चित्रपट असून, पहिल्या दोन दिवसांत त्याच्या कमाईत वाढ झाल्याचे दिसून आले. चित्रपटाने पहिल्या दिवशी 1.88 कोटी रुपये, तर दुसऱ्या दिवशी 2.45 कोटी रुपयांचे भारतातील नेट कलेक्शन केले. दुसऱ्या दिवशी कमाईत सुमारे 30 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.(Weekend Box Office Gross)
राज्य सरकारने निवासी, व्यावसायिक आणि सार्वजनिक इमारतींमधील लिफ्ट, एस्केलेटर आणि मूव्हिंग वॉकवेसाठी सुरक्षा नियम अधिक कडक केले आहेत. आता या सर्व ...
या चित्रपटच्या कथेबद्दल थोडं जाणून घेऊया
या चित्रपटाची कथा दोन वेगवेगळ्या काळात घडते. वर्तमानात 'शक्ती' (नयनतारा) ही एक पोलीस कॉन्स्टेबल असून तिला मयलंची नावाच्या गावाशी संबंधित काही विचित्र स्वप्ने पडतात. या स्वप्नांचे मूळ शोधण्यासाठी ती त्या गावात जाते. तिथे भूतकाळ आणि वर्तमान एकमेकांत गुंफले जातात, जिथे एका राजघराण्यातील राणीने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी दिलेला त्याग आणि देवी अम्मन विरुद्ध साताची उपासना करणारी दृष्ट शक्ती 'भैरवी' (रेजिना कॅसांड्रा) यांच्यातील भयंकर संघर्ष पाहायला मिळतो.
दिवाळीच्या सुट्टीचा चित्रपटांना फायदा
एकंदरीत दिवाळीच्या काळात चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. 'रामायण'ने चार दिवसांत भारतात 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सूर्या यांच्या 'सीन'नेही पहिल्या वीकेंडमध्ये चांगली कमाई केली आहे. तर रजनीकांत यांच्या 'जेलर 2'ने जगभरातील कमाईत मोठा आकडा गाठला आहे. त्यामुळे आगामी दिवसांत या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन किती वाढते, याकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.(Blockbuster Sunday Collection)






