गिल, राहुल आणि कंबोजची जागा कोण घेणार?
शुभमन गिल, केएल राहुल आणि अंशुल कंबोज या तिघांना कसोटी मालिकेच्या तयारीसाठी शेवटच्या दोन वनडे सामन्यातून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल होणार हे निश्चित आहे. असं असताना शेवटच्या दोन सामन्यात शुभमन गिलच्या जागी इशान किशनला संधी मिळू शकते. इशान किशन रोहित शर्मासोबत ओपनिंगला उतरू शकतो. शेवटच्या दोन वनडे सामन्यात इशान किशनकडे उपकर्णधारपदही आहे. त्यामुळे इशान किशन प्लेइंग 11 चा भाग असेल यात काही शंका नाही. माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडूने गिलऐवजी इशान किशनला सलामीची संधी द्यावी असं सूचवलं आहे. तर मधल्या फळीत केएल राहुलऐवजी ऋतुराज गायकवाला पसंती दिली आहे. दिनेश कार्तिकही रायु़डूच्या मताशी सहमत आहे.
England vs South Africa : इंग्लंड क्रिकेट संघाने आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी आपल्या कसोटी संघाची घोषणा केली आहे. डिसेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या या तीन ...
दुसरीकडे, अंशुल कंबोजची जागा कोण घेणार? असा प्रश्नही क्रीडाप्रेमींना डला आहे. यावरही माजी क्रिकेटपटूंनी तोडगा सूचवला आहे. अंशुल कंबोजच्या जागी यश ठाकुरला संधी देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यश ठाकुरला या निमित्ताने एक सामना खेळण्याची संधी मिळेल, असा विश्वासही दोन्ही माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केला आहे.