iPhone 17 Pro : iPhone 17 Pro फक्त 54,990 रुपयांत? रिलायन्स डिजिटलची खास ऑफर; जाणून घ्या अटी

जुन्या iPhone 15 Pro च्या एक्सचेंज व्हॅल्यूचा लाभ घेतल्यास iPhone 17 Pro ची प्रभावी किंमत 54,990 रुपये, तर Pro Max ची किंमत 66,990 रुपये होऊ शकते

Technology News: ॲपलचा महागडा आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर रिलायन्स डिजिटलची ही ऑफर तुमच्यासा महत्त्वाची ठरू शकते. कंपनीच्या स्टोअर्समध्ये iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max च्या 256GB मॉडेलवर विशेष सवलत दिली जात आहे. जुन्या iPhone 15 Pro च्या एक्सचेंज व्हॅल्यूचा लाभ घेतल्यास iPhone 17 Pro ची प्रभावी किंमत 54,990 रुपये, तर Pro Max ची किंमत 66,990 रुपये होऊ शकते. मात्र, या किमतीसाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतील.



iPhone 17 Pro वर किती सूट मिळणार?


iPhone 17 Pro च्या 256GB मॉडेलची मूळ किंमत 1,34,900 रुपये आहे. रिलायन्स डिजिटलमध्ये हा फोन 1,22,990 रुपयांच्या विशेष ऑफर किमतीत उपलब्ध असल्याचे वृत्त आहे. याशिवाय 3,000 रुपयांची इन्स्टंट बँक डिस्काउंट आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळतो. त्यामुळे फोनची किंमत 1,09,990 रुपयांपर्यंत कमी होते.


यानंतर जुन्या iPhone 15 Pro साठी 55,000 रुपयांची एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यास फोनची प्रभावी किंमत 54,990 रुपये होते. म्हणजेच या व्यवहारात एकूण 79,910 रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.



iPhone 17 Pro Max देखील स्वस्त


iPhone 17 Pro Max च्या 256GB मॉडेलची मूळ किंमत 1,49,900 रुपये आहे. रिलायन्स डिजिटलमध्ये हा फोन 1,34,990 रुपयांच्या विशेष किमतीत मिळत असल्याचे सांगितले जात आहे. यावर 3,000 रुपयांची बँक सवलत आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळाल्यानंतर किंमत 1,21,990 रुपये होते.


जुन्या iPhone 15 Pro साठी 55,000 रुपयांची एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यास Pro Max ची प्रभावी किंमत 66,990 रुपये होऊ शकते.



जुन्या फोनची एक्सचेंज व्हॅल्यू महत्त्वाची


या ऑफरमध्ये जुन्या स्मार्टफोनची एक्सचेंज व्हॅल्यू महत्त्वाची आहे. 55,000 रुपयांची किंमत प्रत्येक फोनसाठी मिळेलच असे नाही. ही रक्कम iPhone 15 Pro च्या एक्सचेंजवर आधारित आहे. फोनचे मॉडेल, स्थिती आणि इतर अटींनुसार एक्सचेंज व्हॅल्यू बदलू शकते.


उदाहरणार्थ, जुन्या फोनची एक्सचेंज व्हॅल्यू 55,000 रुपयांऐवजी 20,000 रुपये मिळाल्यास iPhone 17 Pro ची अंतिम किंमत सुमारे 89,990 रुपये होईल. त्यामुळे खरेदीपूर्वी स्टोअरमध्ये आपल्या जुन्या फोनची एक्सचेंज व्हॅल्यू तपासणे आवश्यक आहे.



जुना फोन एक्सचेंज न केल्यास किती किंमत द्यावी लागेल?


जुना फोन एक्सचेंज न करता iPhone 17 Pro खरेदी करायचा असल्यास 54,990 रुपयांची ऑफर लागू होणार नाही. बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनसचा लाभ घेतल्यानंतरही फोनची किंमत 1,09,990 रुपये राहते. कंपनीकडून 12 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआयचे पर्यायही उपलब्ध असल्याचे वृत्त आहे. iPhone 17 Pro साठी मासिक हप्ता सुमारे 4,833 रुपये, तर Pro Max साठी सुमारे 5,833 रुपये असल्याचे सांगितले जात आहे.



iPhone 17 Pro चे फीचर्स काय आहेत?


iPhone 17 Pro मध्ये ॲपलचा A19 Pro चिपसेट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.3 इंचांचा Super Retina XDR OLED डिस्प्ले असून, तो 120Hz पर्यंतच्या ProMotion रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. मागील बाजूस 48 मेगापिक्सेलचे प्रायमरी, अल्ट्रा-वाइड आणि टेलीफोटो असे तीन कॅमेरे आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 18 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.


याशिवाय ProRes RAW आणि Apple Log 2 व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा, सुधारित उष्णता व्यवस्थापनासाठी व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टीम आणि Ceramic Shield 2 संरक्षण देण्यात आले आहे.




Comments
Add Comment

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांकडून आदिवासी विकासाचा आढावा; पुणे आणि बीडमध्ये विशेष सेवा सप्ताहाचे आयोजन

पुणे: भगवान बिरसा मुंडा यांची आज 151 वी जयंती. त्यानिमित्ताने राज्यात 11 ते 18 नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा

IPL ची 'मिस्ट्री गर्ल' काव्या मारन अडकणार विवाहबंधनात! संगीतकार अनिरुद्धसोबत ग्रीसमध्ये साखरपुडा

संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादच्या सह-मालक काव्या मारन यांचा १० नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये

आयसीसी वनडे क्रमवारीत टीम इंडियाचाच डंका; शुभमन गिल अव्वल स्थानी, तर रोहित-विराटमध्ये जोरदार चुरस!

[caption id="attachment_1074142" align="aligncenter" width="800"] आयसीसीने आठवड्याभरानंतर वनडे क्रमवारी अपडेट केली आहे. या क्रमवारीत भारतीय फलंदाजांचा

रशिया-युक्रेन युद्धाला पूर्णविराम मिळणार? अबू धाबीतील गुप्त त्रिपक्षीय चर्चेने उडाली खळबळ

अबू धाबी: संपूर्ण जगाचे लक्ष सध्या संयुक्त अरब अमिरातीवर (यूएई) केंद्रित झाले असून, गेल्या चार वर्षांपासून जगाला

Navi Mumbai: कळंबोलीत पोलिसालाच भरधाव कारची धडक! २०० मीटरपर्यंत फरफटत नेले; चालक फरार, कारचा नंबरही बनावट!

Navi Mumbai: नवी मुंबईतील गजबजलेल्या कळंबोली (Kalamboli) या परिसरातील रोडपाली येथे नाकाबंदी दरम्यान एक धक्कादायक घटना समोर

Mumbai Crime News : दुचाकीजवळ फटाके फोडण्यास विरोध केल्याने तरुणाची हत्या, जुहूमध्ये दोघांना अटक

Mumbai Crime News: मुंबईतील जुहू परिसरात लक्ष्मीपूजेच्या दिवशी फटाके फोडण्यावरून झालेल्या वादातून 19 वर्षीय तरुणाचा