
ठाणे: अन्न- औषध प्रशासनाकडून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, धाड सत्र टाकून अन्न भेसळ करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर विशेष अन्न सुरक्षा मोहिम हाती घेतली आहे. सणासुदीच्या काळात अन्न भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा भाग म्हणून, मुंब्रा पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने वीर सावरकर नगरमधील एका फ्लॅटवर छापा टाकून 58 किलोग्रॅम भेसळयुक्त तूप जप्त केले.
ठाणे: ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्यानंतर ठाणे जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये ...
मुंब्रामध्ये, हायड्रोजनेटेड वनस्पती तूप आणि पाम तेल मिसळून बनावट तूप तयार केले जात असल्याची माहिती FDA ला मिळाली. त्याच माहितीच्या आधारावर मुंब्रा पोलिसांनी आणि FDA च्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी आणि अधिकाऱ्यांनी 55 वर्षीय मनोज साहू नावाच्या व्यापाऱ्याला ताब्यात घेतले आहे. मुंब्रा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारप, 6 नोव्हेंबर रोजी, मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी नियमित गस्त घालत असताना, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ थोरवे यांना वीर सावरकर नगर येथील एका निवासी फ्लॅटमध्ये बनावट तूप तयार केले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. धोक्याचे गांभीर्य ओळखून, कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी तात्काळ एफडीए (FDA) अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आरोपीला जेरबंद केले.
Thane News: दिवाळीच्या रात्री ठाण्यातील रहेजा गार्डन परिसरातील रहेजा कार्लाइन या 17 मजली इमारतीला भीषण आग लागली. इमारतीच्या 8 व्या मजल्यावरील एका घरात ...
मुंब्रा पोलिसांनी आणि FDA च्या अधिकाऱ्यांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर एका संयुक्त तपास पथकाने मुंब्र्यातील वीर सावरकर नगरमध्ये छापा टाकत, उत्पादन साहित्य आणि उपकरणे ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले की, संशयित शुद्ध तुपासारखे दिसण्यासाठी वनस्पती तूप आणि पाम तेलाची भेसळ करत होता. अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून 58 किलो भेसळयुक्त तुप जप्त केले आहे. प्राथमिक चौकशी दरम्यान, मनोजने हे तूप विकण्यासाठी तयार करत असल्याचे कबूल केले आहे. त्याच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापारी मनोज साहूने यापूर्वी कोणकोणत्या स्थानिक बाजारपेठांमध्ये हा बनावट तूप नागरिकांना विकले आहे? याची सध्या चौकशी केली जात आहे. या बनावट तुपामुळे नागरिकांना काही त्रास जाणवला आहे का? याची ही चौकशी केली जात आहे.
Thane: एकाच छताखाली सर्व गरजूंना शासकीय योजनांचा लाभ ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शहापूर येथे मिळणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रमुख ...
इतकंच नाही तर, मुंब्रा पोलिसांकडून आणि FDA च्या अधिकार्यांकडून मनोजकडून हे तूप कोणकोणत्या दुकानदारांना आणि व्यवसायिकांना देत होता? याचा सुद्धा तपास केला जात आहे. मनोजने छाप्यापूर्वी विकलेल्या मालाचे एकूण प्रमाण निश्चित करण्यासाठी अधिकारी पुरवठा साखळीचाही मागोवा घेत आहेत. या घटनेमुळे सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा नागरिकांच्या अन्न सुरक्षा आणि ग्राहक संरक्षणाबाबतची चिंता अधोरेखित झाली आहे.






