Wednesday, November 11, 2026

Pravin Tarde Birthday: तो ब्लाॅकबस्टर आहे, तो डायलाॅगमास्टर आहे...प्रवीण तरडेंच्या वाढदिवसानिमित्त विजू मानेंची खास पोस्ट

'देऊळ बंद' फेम मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे यांचा आज वाढदिवस.त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या खास प्रसंगी दिग्दर्शक विजू माने यांनी प्रवीण तरडेंसाठी लिहिलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विजू माने नेमकं काय म्हणाले? त्यांची पोस्ट सोशल मीडियावर इतकी व्हायरल का होत आहे? एकेकाळचे स्पर्धक ते 'खतरनाक मित्र' अशी विजू माने आणि प्रवीण तरडे यांची मैत्री.

Pravin Tarde Birthday: 'देऊळ बंद' फेम मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे यांचा आज वाढदिवस.त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या खास प्रसंगी दिग्दर्शक विजू माने यांनी प्रवीण तरडेंसाठी लिहिलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विजू माने नेमकं काय म्हणाले? त्यांची पोस्ट सोशल मीडियावर इतकी व्हायरल का होत आहे? एकेकाळचे स्पर्धक ते 'खतरनाक मित्र' अशी विजू माने आणि प्रवीण तरडे यांची मैत्री.

दोन दिग्दर्शकांमध्ये अत्यंत घट्ट मैत्री आहे आणि हाच जुना काळ आठवत विजू माने यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. विजू माने यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून प्रवीण तरडेंचा एक फोटो शेअर करत त्यांच्यातील निखळ मैत्रीचा प्रवास चाहत्यांसमोर सांगितला आहे.

विजू मानेंची पोस्ट खतरनाक मित्र. प्रवीण तरडे भाई का बड्डे.... तो ब्लाॅकबस्टर आहे, तो डायलाॅगमास्टर आहे...ह्या सगळ्या पलीकडे तो प्रत्येकाच्या आयुष्यात असावा असा मित्र आहे... मदत कुणाला करायची आहे? याच्या आधी मदत काय करायची आहे? हा प्रश्न येणारा दिलदार. माझ्या एकांकिका काळातला प्रतिस्पर्धी आता माझ्या प्रत्येक सिनेमाचा 'निस्वार्थ' भाग असतो. लव्ह यू मित्रा. खूप मोठा आहेसच. अजून मोठा हो...happywala birthday

 
View this post on Instagram
 

A post shared by viju mane (@vijumaneofficial)

या पोस्टवर प्रवीण तरडे यांनीही कमेंट केली आहे. खूप खूप धन्यवाद मित्रा विजू.. आपली मैत्री पण ब्लॅाकबस्टर आहे.

प्रवीण तरडे यांनी 'देऊळ बंद', 'मुळशी पॅटर्न', 'धर्मवीर' आणि 'सरसेनापती हंबीरराव' यांसारख्या भव्य चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. तर दुसरीकडं विजू माने यांनीही आपल्या दिग्दर्शनानं मराठी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. 'पांडू' चित्रपटादरम्यान या दोघांची जुळलेली केमिस्ट्री प्रेक्षकांनी बघितली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >