ॲपलनंतर आता एनव्हिडियाची धुरा सांभाळणार टिम कुक? जेन्सन हुआंग यांच्या जागी नावाची जोरदार चर्चा!

एनव्हिडियाचे सीईओ एका गुप्तहेरासोबतच्या कथित प्रेमसंबंधांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांना आपल्या पायउतार व्हावं लागेल, असं दिसत आहे. जेन्सन हुआंग सध्या एनव्हिडियाचे सीईओ पदावर कायम आहेत. पण त्यांच्यानंतर सीईओपदी टिम कुक असतील अशी चर्चा रंगली आहे.

जगातील सर्वात मोठी कंपनी असलेली एनव्हिडीया कंपनीचे सीईओ सध्या जोरदार चर्चेत आहेत. कथित विवाहबाह्य संबंधांमुळे चर्चेत आले आहेत. इतकंच काय तर ज्या महिलेसोबत संबंध होते, ती चिनी गुप्तहेर असल्याचा आरोप होत आहे. यामुळे हुआंग यांचं सीईओपद धोक्यात आलं आहे. त्यामुळे एनव्हिडीयामध्ये एका मोठ्या बदलाची चर्चा सुरू आहे. जेन्सन हुआंग यांनी 1993 मध्ये एनव्हिडियाची स्थापना केली आणि तीन दशकांहून अधिक काळ कंपनीचे नेतृत्व केले आहे. आता या पदासाठी ॲपल कंपनीचे माजी सीईओ टिम कुक यांचं नाव चर्चेत आहे. त्यांच्यासोबत एनव्हिडीया कंपनीतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावंही चर्चेत आहेत. असं असताना टिम कुक सीईओ पद स्वीकारतील का? हा देखील प्रश्न आहे. काही दिवसांपूर्वी टिम कुक हे ॲपलच्या सीईओ पदावरून पायउतार झाले आहेत. त्यांच्या जागी जॉन टर्नस यांची सीईओपदी नियुक्ती झली आहे. तर कुक ॲपलच्या संचालक मंडळात कायम असून उपाध्यक्षही आहेत. पण त्यांचं नाव अचानक चर्चेत येण्याचं कारण काय?

टिम कुक यांचेच नाव का चर्चेत?


येल स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे प्राध्यापक जेफ्री सोन्नेनफेल्ड यांनी एनव्हिडीया सीईओपदासाठी नाव त्यांचं नाव सुचवलं आणि चर्चेला उधाण आलं. एनव्हिडियाचे भविष्य आणि जेन्सन हुआंग यांच्या संभाव्य उत्तराधिकाऱ्याविषयी चर्चा करताना त्यांनी टिम कुक यांचे नाव घेतले होते. जर एखाद्या वरिष्ठ संस्थापकानंतर कंपनीची सूत्रे हाती घेण्यासाठी एनव्हिडियाला बाहेरच्या कोणाची गरज असेल, तर टिम कुक एक उत्तम पर्याय ठरू शकतात, असं त्यांनी म्हंटलं होतं. टिम कुक यांच्याकडे दांडगा अनुभव असल्याचं त्यांनी सांगितलं. ॲपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या निधनानंतर 2011 मध्ये टीम कुकने अॅपलची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. त्यामुळे त्यांनी एनव्हिडीयाच्या सीईओपदासाठी टिम कुकचं नाव सूचवलं.


एनव्हिडियाकडून नव्या सीईओचा शोध सुरू


आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात एनव्हिडियाचा वरचष्मा आहे. प्रमुख टेक कंपन्या एआय मॉडेल्स आणि डेटा सेंटर्स तयार करण्यासाठी एनव्हिडिया चिप्सवर अवलंबून असतात. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, एनव्हिडिया संभाव्य उत्तराधिकारी शोधण्यासाठी एका बाहेरील फर्मची मदत घेत आहे. या अहवालात इयान बक, कॉलेट क्रेस आणि रेने हास यांच्यासह अनेक नावांचा उल्लेख आहे. कंपनीचे संचालक मंडळ पुढे काय निर्णय घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
Comments
Add Comment

New Year In Dubai: बुर्ज खलिफाजवळ हॉटेल रूमचे दर गगनाला भिडले; नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी!

नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं जातं. काही जण कुटुंबासोबत तर काही जण

Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा विशेष सन्मान; न्यूयॉर्कमधील 'व्हेटरन्स डे' परेडच्या ग्रँड मार्शल म्हणून नेतृत्व

Sunita Williams : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना अमेरिकेतील 'व्हेटरन्स डे' परेडमध्ये 'ग्रँड

ब्रुकलिनमध्ये इमारतीचा भाग कोसळला, 2 ठार, 17 जखमी, एकजण अजूनही ढिगाऱ्याखाली

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील ब्रुकलिन भागात बुधवारी दुपारी एका तीन मजली इमारतीचा भाग कोसळल्याची मोठी दुर्घटना

फारसच्या आखातात दुबईकडे जाणाऱ्या तेलवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय खलाशासह चौघे गंभीर जखमी!

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवून देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री सर्बानंद

रशिया-युक्रेन युद्धाला पूर्णविराम मिळणार? अबू धाबीतील गुप्त त्रिपक्षीय चर्चेने उडाली खळबळ

अबू धाबी: संपूर्ण जगाचे लक्ष सध्या संयुक्त अरब अमिरातीवर (यूएई) केंद्रित झाले असून, गेल्या चार वर्षांपासून जगाला

होर्मुझच्या सामुद्रधुनीत तीन तेलवाहू जहाजांवर भीषण हल्ले; आखातात युद्धाचे ढग दाटले!

तेहरान: मध्यपूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत खळबळजनक, धक्कादायक आणि युद्धाची