नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं जातं. काही जण कुटुंबासोबत तर काही जण मित्रमंडळींसोबत नवीन वर्ष साजरं करतात. मात्र, दुबईमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या तयारीची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. यंदा 2027 च्या स्वागतासाठी दुबईमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. याच पार्श्वभूमीवर येथील हॉटेल्स आणि लक्झरी अपार्टमेंट्सच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, दुबईमध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी तब्बल 25 लाख रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे दुबईमध्ये असं नेमकं काय होणार आहे, की पर्यटक एवढे पैसे खर्च करण्यास तयार आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
एका रात्रीच्या मुक्कामासाठी 25 लाख रुपये!
दुबईतील डाउनटाउन परिसरात हॉटेल आणि लक्झरी अपार्टमेंट्सच्या बुकिंगला मोठी मागणी आहे. बुर्ज खलिफाचे थेट दृश्य दिसणाऱ्या तीन बेडरूमच्या एका आलिशान अपार्टमेंटचे एका रात्रीचे भाडे तब्बल 1 लाख 7 हजार UAE दिरहम आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम अंदाजे 25 लाख रुपयांच्या आसपास आहे. या अपार्टमेंटमध्ये इन्फिनिटी पूलची सुविधाही आहे. विशेष म्हणजे, या किमतीमध्ये कराचाही समावेश आहे. त्यामुळे बुर्ज खलिफाचे दृश्य पाहण्यासाठी आणि नवीन वर्षाचा आनंद खास पद्धतीने साजरा करण्यासाठी पर्यटकांना मोठी रक्कम खर्च करावी लागत आहे.(DubaiHotels)
बुर्ज खलिफाची आतषबाजी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारतींपैकी एक आहे. दरवर्षी 31 डिसेंबरच्या मध्यरात्री येथे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भव्य आतषबाजी आणि आकर्षक रोषणाई केली जाते. या सोहळ्याला जगभरातून लाखो लोक आकर्षित होतात. बुर्ज खलिफाच्या परिसरात उभं राहून हा सोहळा पाहण्याचा अनुभव घेण्यासाठी अनेक पर्यटक दुबईला भेट देतात. काही पर्यटक तर बुर्ज खलिफाचे थेट दृश्य दिसणाऱ्या हॉटेल्स किंवा अपार्टमेंट्समध्ये राहण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे या परिसरातील निवासस्थानांना मोठी मागणी निर्माण होते.(DubaiHotels)
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील धार्मिक व ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनाला वेग आला आहे. लाखो ...
सामान्य भाड्याच्या तुलनेत दहापट वाढ
नववर्षाच्या सेलिब्रेशनमुळे दुबईतील काही लक्झरी अपार्टमेंट्सचे भाडे सामान्य दिवसांच्या तुलनेत तब्बल दहापट वाढले आहे. काही ठिकाणी एका रात्रीऐवजी किमान तीन रात्रींचे बुकिंग करणे आवश्यक करण्यात आले आहे. एका बेडरूमच्या लक्झरी अपार्टमेंटसाठी तीन रात्रींचे एकूण भाडे 2 लाख 83 हजार 500 दिरहम म्हणजेच भारतीय चलनात अंदाजे 66 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. याशिवाय दुबई ऑपेरा परिसरातील एका दोन बेडरूमच्या अपार्टमेंटचे सामान्य दिवसांतील भाडे जवळपास 3 हजार दिरहम असताना नववर्षाच्या काळात ते 35 हजार दिरहमपर्यंत पोहोचले आहे.
अटलांटिसमध्ये केटी पेरीचा खास कार्यक्रम
दुबईतील अटलांटिस द पाम येथेही नववर्षाच्या स्वागतासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या सेलिब्रेशनमध्ये प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय गायिका केटी पेरी मुख्य आकर्षण असणार आहे. या कार्यक्रमासाठी विशेष व्हीआयपी सुविधाही उपलब्ध आहेत. कार्यक्रमातील 'सेलेस्टियल स्काय सूट' या व्हीआयपी अनुभवासाठी तब्बल 4 लाख दिरहम म्हणजेच भारतीय चलनात अंदाजे 90 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च येऊ शकतो. यामध्ये स्टेज आणि आतषबाजीचे दृश्य, खास आसनव्यवस्था आणि वैयक्तिक बटलर सेवा अशा सुविधा देण्यात येणार आहेत.(BurjKhalifa)
नवी दिल्लीच्या ऐतिहासिक नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक इमारती आता एका नव्या भूमिकेसाठी सज्ज झाल्या आहेत. सरकारी कार्यालये येथून हलवल्यानंतर रायसीना हिलवरील ...
फक्त दुबईच नाही, तर रास अल खैमामध्येही दरवाढ
नववर्षाच्या स्वागतासाठी केवळ दुबईमध्येच नाही, तर संयुक्त अरब अमिरातीमधील रास अल खैमा येथेही निवासस्थानांच्या भाड्यात मोठी वाढ झाली आहे. येथील मार्जन आयलंड परिसरातील चार बेडरूमच्या व्हिला आणि खासगी पूल असलेल्या निवासस्थानाचे एका रात्रीचे भाडे जवळपास 50 हजार दिरहमपर्यंत पोहोचले आहे. सामान्य दिवसांत याच निवासस्थानाचे भाडे जवळपास 2 हजार दिरहम होते. याशिवाय रास अल खैमा येथे 31 डिसेंबरला तब्बल 11 तासांच्या सेलिब्रेशनचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये आतषबाजी आणि ड्रोन शोचाही समावेश असणार आहे.
हॉटेलच्या किमती वाढण्यामागचं कारण काय?
नववर्षाच्या काळात दुबईमध्ये देश-विदेशातून पर्यटक येतात. बुर्ज खलिफाची आतषबाजी, आलिशान पार्ट्या, सेलिब्रिटींचे कार्यक्रम आणि खास पर्यटन अनुभव यामुळे या काळात निवासस्थानांची मागणी वाढते. मागणीच्या तुलनेत उपलब्ध खोल्या कमी पडू लागल्यास हॉटेल्स आणि अपार्टमेंट्सचे दर वाढतात. त्यामुळे 31 डिसेंबरच्या रात्रीसाठी काही ठिकाणी लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. अशा प्रकारे 2027 च्या स्वागतासाठी दुबईमध्ये आतापासूनच जोरदार तयारी सुरू झाली असून, यंदाचे न्यू इयर सेलिब्रेशन पर्यटनविश्वात चर्चेचा विषय ठरत आहे.(DubaiNewYear)