Thursday, November 12, 2026

Nanded News: 'दुष्काळात तेरावा महिना'! रील बनवण्याच्या नादात फटाक्यांची आतषबाजी; पाच एकर ऊस जळून खाक, Video

या दुर्दैवी घटनेमुळे आधीच आर्थिक संकटत असलेल्या नांदेडच्या त्या शेतकऱ्यावर अक्षरशः 'दुष्काळात तेरावा महिना' अशी दयनीय परिस्थिती ओढवली

नांदेंड : महाराष्ट्रात आधीच भीषण दुष्काळजन्य परिस्थिती असताना, नांदेडमधून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. दिवाळीत रील शूट करण्याच्या नादात काही जणांनी केलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे एका हतभागी शेतकऱ्याचे उभे 5  एकर ऊसाचे शेत जळून खाक झाले आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे आधीच आर्थिक संकटत असलेल्या नांदेडच्या त्या शेतकऱ्यावर अक्षरशः 'दुष्काळात तेरावा महिना' अशी दयनीय परिस्थिती ओढवली असून, वर्षभर केलेल्या कष्टावर अवघ्या काही सेकंदांत पाणी फेरले गेले आहे.

रील शूट करताना फटाक्यांची आतषबाजी

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर वळण रस्त्यावर काही रील स्टार तरुण-तरुणी व्हिडिओ शूट करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. या फटाक्यांमुळे जवळच असलेल्या ऊसाच्या शेताला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि शेतातील मोठ्या क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाला.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान होण्याची शक्यता

शेतकरी माणिकराव शिंदे यांनी मोठ्या कष्टाने ऊसाचे पीक घेतले होते. मात्र, या आगीमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. आधीच नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यावर आता आर्थिक संकट ओढवले आहे. आगीत जळालेल्या 5 एकर ऊसामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

नुकसानभरपाईची शेतकऱ्याची मागणी

सार्वजनिक ठिकाणी रील शूट करताना फटाक्यांची आतषबाजी करणाऱ्यांवर पोलीस आणि प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तसेच आगीत जळालेल्या ऊसाच्या नुकसानीची शासनाने तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी माणिकराव शिंदे यांनी केली आहे.

सोशल मीडियासाठी रील बनवण्याच्या हौसेपोटी केलेल्या आतषबाजीचा फटका थेट शेतकऱ्याला बसला आहे. या नुकसानीची भरपाई कोण देणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >